‘#NoBra मूव्हमेंट’ सुरू करून ट्रोल झालेली 26 वर्षीय सिंगर, अ‍ॅक्ट्रेसचा मृतदेह घरात सापडल्याने प्रचंड खळबळ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – #NoBra कॅम्पेनमुळे जगात चर्चेत आलेली इंटरनॅशनल पॉप स्टार सुली (Sulli) आपल्या घरात मृत सापडली आहे. के पॉप स्टार आणि अ‍ॅक्ट्रेस सुलीचा मृतदेह सोमवारी साउथ कोरियातील सोलमधील तिच्या घरात आढळून आला. तिच्या मृतदेहापाशी एक नोटही मिळाली आहे. परंतु यात काय लिहिलं आहे हे मात्र स्थानिक पोलिसांनी उघड केलेलं नाही. 25 वर्षीय सुली काही दिवसांपूर्वी सिवियर डिप्रेशनने ग्रस्त होती. तिच्या मृत्यूचा संबंध सोशल मीडियातील ट्रोलिंगशी लावला जात आहे.

#NoBra कॅम्पेनची सुरुवात
काही दिवसांपूर्वी साऊथ कोरियात नोब्रा (#NoBra) कॅम्पेन खूपच चर्चेत आलं होतं. अनेक महिलांनी ब्रा न घालताच कपडे घालत अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. याची सुरुवात सिंगर आणि अ‍ॅक्ट्रेस सुलीने इंस्टाग्रामवरून ब्रा न घालताच कपडे घातलेला फोटो शेअर करत केली होती. अनेक महिलांनी याबाबत सुलीचे कौतुक केले. परंतु सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल करण्यात आलं. तिच्या विषयी खूपच वाईट लिहिलं जाऊ लागलं. यामुळेच ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

…आणि सुली मृत अवस्थेत दिसली
सियोल पोलिसांनी सीएनएनला माहिती दिली आहे की, ते या पू्र्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तिच्या मृत्यूबाबत त्यांना कोणताही अनुमान लावायचा नाही. पोलिसांनी सांगितलं आहे की, सुलीच्या घरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये कोणाच्याही येण्या-जाण्याचं कसलंही फूटेज नाही. सुलीच्या मॅनेजरचं म्हणणं आहे की तो सकाळपासून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पंरतु तिच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. यानंतर त्याने सुलीच्या घरी जात तिला भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुली मृत अवस्थेत दिसली.

फेमिनिजमवर आपलं बिंधास्त मत मांडण्यासाठी ती ओळखली जायची सुली
सुलीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सुलीने चाईल्ड आर्टीस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 2009 साली तिने फीमेल के-पॉप बँड f(x) जॉईन केला होता. फेमिनिजमवर आपलं बिंधास्त मत मांडण्यासाठी ती ओळखली जात होती.

 

Visit : Policenama.com