सिनेमातील रोलसाठी हॉलिवूड स्टारनं छाती आणि पोटावर काढला Tattoo ! फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सिनेसृष्टीत असे अनेक स्टार्स आहेत जे आपल्या रोलसाठी काहीही करू शकतात. असाच एक स्टार शिया लेबॉफ आहे. शिया लेबॉफनं आपल्या नवीन सिनेमासाठी आपल्या छातीवर आणि पोटावर पर्मनंट टॅटू बनवला आहे. शिया आगामी सिनेमा टॅक्स कलेक्टरमुळं चर्चेत आहे. आता हा टॅटू समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये सिनेमाला घेऊन उत्सुकता आणखी वाढली आहे.

या सिनेमात शिया लॉस एंजेलिसचा गँगस्टर क्रीपरचा रोल साकारत आहे. डेविड आयर हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. आयर आणि शिया यांनी याआधी फ्युरी या सिनेमातही काम केलं आहे.

डेविडनं एका मुलाखतीत सांगितलं की, “मी आतापर्यंत जेवढ्या पण अ‍ॅक्टर्ससोबत काम केलं त्यात शिया खूप डेडिकेटेड आहे. तो आपल्या रोलसाठी कायमच खूप कमिटेड असतो. फ्युरी सनेमासाठी त्यानं एक दात काढला होता. आता आागामी सिनेमासाठी त्यांनी पूर्ण छातीवर आणि पोटावर टॅटू बनवला आहे. आपला रोल तो खूप मनापासून साकारत असतो.”

शियाच्या छातीवर आणि पोटावर टॅटू काढणाऱ्या आर्टीस्ट ब्रायन समिरेजनं इंस्टावरून शियाचा फोटो शेअर केला आहे. ब्रायननं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, शियाचं पालनपोषण इकोपार्कमध्ये झाली आहे. मी त्याचे आभार मानतो की, त्यानं मला ही संधी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला.