गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे ? मंत्रिमंडळ विस्तार एक-दोन दिवसात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी अनेक कामकाजाच्या सध्याच्या परिस्थितीचा अहवाल मागून घेतला आहे. परंतु ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे तूर्तास गृहखाते राहणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तसेच पुढील एक दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लवकरात लवकर खाते वाटप व्हावे अशी मागणी यावेळी शरद पवारांनी केल्याचे समजते. या बैठकीसाठी अजित पवार, जयंत पाटील, खा. संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांची उपस्थिती होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे तूर्तास तरी गृहखाते हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे समजते.

२८ नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारचा शपथविधी पार पडला त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबतच या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. एसीबीकडून मिळालेल्या क्लीनचीट नंतर अजित पवार हे देखील मंत्री पदाच्या प्रतीक्षेत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या सोबत तीनही पक्षातील दोन – दोन मंत्र्यांनी मंत्री पदाची शपत घेतली होती कामकाजाला लवकरच सुरुवात करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरच होईल अशी आशा वर्तवली जात आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधल्या कोणत्या नेत्याला कोणते मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com