स्ट्रोक, हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या असणाऱ्या नागरिकांना घरबसल्या रक्तचाचणी, वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कुठल्याही प्रकारच्या आजाराचे अचुक निदान करायचे असल्यास रक्तचाचणी अत्यंत महत्त्वाची असते. पण सध्या कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोक रक्त चाचणीसाठी घराबाहेर पडण्यास घाबरतात. अशा रूग्णांना घरबसल्या वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे अपोलो डायग्नोटिस्क या प्रयोगशाळेनं पुढाकार घेतलाय. या लॅबमधील कर्मचारी घरोघरी जाऊन रूग्णांच्या रक्ताचे नमूने घेत आहेत. जेणेकरून रूग्णाला कुठेही बाहेर न जाता घरच्या घरी रक्त चाचणीची सुविधा मिळू शकेल. या नव्या उपक्रमामुळे पुणेकरांना नक्कीच दिलासा मिळतोय.

मुंबईसह पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेने पुन्हा लॉकडाऊन केला असून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार कमी होण्यास मदत करण्यासाठी अनेक लोक जुन्या किंवा चालू असलेल्या वैद्यकीय उपचारांकरिता रूग्णालयात जाण्याऐवजी लोक घरीच सावध राहत आहेत. हे लक्षात घेऊन रूग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपोलो डायग्नोस्टिक या प्रयोगशाळेनं एक अनोखा उपक्रम सुरू केलायं. याद्वारे पुण्यात घरोघरी जाऊन रूग्णांची रक्तचाचणी केली जात आहे.

महत्त्वाचं म्हणजे, स्ट्रोक, हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या असणाऱ्या नागरिकांना नियमित रक्ताची चाचणी करावी लागते. वेळीच निदान व उपचार न मिळाल्यास गंभीर परिस्थितीत ओढावू शकते. या सर्व बाबींचा विचार करून रूग्णांची रक्तचाचणी घरबसल्या करण्याचा निर्णय अपोलो डायग्नोस्टिक लॅबनं घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत १२,००० हून अधिक रक्ताचे नमूने गोळा केले आहेत.

लोकांच्या घरी रक्ताचे नमूने गोळा करायला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) किटचा वापर केला जात आहे. याशिवाय कोविड-१९ प्रोटोकॉलचा वापर करूनच ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

याबाबत बोलताना अपोलो डायग्नोस्टिक्स तांत्रिक प्रमुख (वेस्ट इंडिया) डॉ. संजय इंगळे म्हणाले की, “दमा, हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या तीव्र आजार जीवावर बेतणारे आहेत. या आजाराला नियंत्रणात ठेवणे गरजेचं आहे. वेळीच औषधोपचार न घेतल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. या अनुषंगाने पुणेकरांना घरातच राहून रक्तचाचणीची सुविधा द्यावी, या उद्देशाने अपोलो डायग्नोस्टिक्स लॅंबनं हा उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. या सुविधेद्वारे रूग्णाच्या रक्ताचे नमूने घरी जाऊन घेतले जात आहेत. याशिवाय अचूक निदान करून रूग्णांना लवकरात-लवकर अहवाल उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून या वैद्यकीय अहवालाद्वारे डॉक्टर रूग्णावर उपचार करू शकतील.’’

डॉ. इंगळे पुढे म्हणाले की, ‘‘उपचारास विलंब झाल्यास रूग्णाचा आजार वाढू शकतो. अशावेळी गुंतागुंत निर्माण झाल्यास डॉक्टरांना उपचार करणे अवघड होते. म्हणूनच, अपोलो डायग्नोस्टिक लॅबने त्यांच्या कुटुंबियांना आणि रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी घराघरात जाऊन रक्ताचे नमून संकलित करण्यासाठी आपली टीम वाढविली आहे.’’