Home Cleaning Tricks | दिवाळीपूर्वी चमकवा तुमचे घर, पंख्यापासून फरशीपर्यंतच्या स्वच्छतेसाठी उपयोगी पडतील ‘या’ 9 ट्रिक्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Home Cleaning Tricks | दिवाळीच्या सणापूर्वी घरोघरी महिलांची साफसफाईची लगबग सुरू असते. ही स्वच्छता दिवाळीपूर्वी काही दिवस अगोदर सुरू केली पाहिजे. शिवाय काही सोप्या पद्धतींनी (Home Cleaning Tricks) ती केल्यास कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त स्वच्छता करू शकता. या ट्रिक्स जाणून घेवूयात…

 

1. स्वच्छतेपूर्वी हे साहित्य जमवा –
दिवाळीपूर्वी किमान 2 आठवडे अगोदर स्वच्छता सुरू करा. डिसइन्फेक्टंट, बेकिंग सोडा, व्हाईट व्हिनेगर, अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर, लिंबू, स्क्रब, ब्रश, क्लॉथ वाइप्स, कचरा बॅग, काचेसाठी मायक्रोफायबर कपडा, फॅब्रिक सॉफ्टनर आणि स्ट्रेन रिमूव्हर. काही टिप्समुळे दिवाळीची स्वच्छता सोपी होऊ शकते. (Home Cleaning Tricks)

 

2. व्हाईट व्हिनेगरने करा काचेची स्वच्छता –
थोड्या पाण्यात व्हाईट व्हिनेगर मिसळून दरवाजे आणि खिडक्यांची स्वच्छता करा. मायक्रोफायबर किंवा नरम कपड्याने स्वच्छ करा.

 

3. लिंबूने करा मायक्रोवेव्हची स्वच्छता –
अर्धी वाटी पाण्यात अर्धे लिंबू पिळून घ्या. आता हे पाणी मायक्रोवेव्हमध्ये चांगले उकळवून 10 मिनिटे तसेच ठेवा. याची आद्रता मायक्रोवेव्हमध्ये पसरेल. नंतर नरम कपड्याने पुसून घ्या. यामध्ये थोडे व्हाईट व्हिनेगर मिसळल्यास आणखी चमक येईल. (Home Cleaning Tricks)

 

4. पंखा स्वच्छ करण्यासाठी उशीचे कव्हर –
एक जुने उशीचे कव्हर घेऊन ते पंख्याच्या ब्लेडमध्ये टाका जसे उशीवर चढवतात. नंतर त्यावरून ब्लेड पकडून स्वच्छ करा. अशाप्रकारे त्यावर जमलेली घाण कव्हरद्वारे बाहेर येईल आणि फरशीवर पडणार नाही.

 

5. कठिण डागासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि लिंबू –
नळ, भांडी, बादल्यांजवळ पडलेले डाग काढण्यासाठी डागांवर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि लिंबूचा रस समान प्रमाणात मिसळून लावा आणि 15 मिनिटासाठी असे सोडून द्या. यानंतर कपड्याने पुसून घ्या. पाण्याने सुद्धा धुवू शकता.

6. टाईल्ससाठी बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साईड –
किचन आणि बाथरूमच्या टाइल्ससाठी एक चमचा बेकिंग सोड्यात हायड्रोजन पेरोक्साईडचे काही थेंब टाका आणि पेस्ट बनवा. जुन्या टूथब्रशने ही पेस्ट टाइल्सवर लावा. यावरील घाण स्वच्छ होईल.

 

7. डिश शॉप आणि बेकिंग सोड्याने चमकवा बाथरूम –
सर्वात जास्त घाण बाथरूमच्या वॉश बेसिनवर जमा होते. वॉश बेसिनवर थोड्या प्रमाणात बेकिंग सोडा शिंपडा, स्क्रबवर डिश वॉशचा एक थेंब घ्या आणि याद्वारे पृष्ठभाग स्वच्छ करा. (Home Cleaning Tricks)

 

8. पडद्यांची स्वच्छता –
दिवाळीत धुतलेले चांगले पडदे लावा यामुळे घर खुलते. सोबत बेडशीट, बेड-कव्हर, पिलोकेस, कुशन कव्हर, नॅपकिन आणि किचन टॉवेल बदला.

 

9. गाद्या स्वच्छ करा –
गाद्यांवर जमलेली धुळ व्हॅक्यूम करू शकता. शिवाय बेकिंग सोडा आणि व्हिनेगरने सुद्धा स्वच्छ करू शकता. एका बाटलीत व्हिनेगर घ्या आणि ते संपूर्ण गादीवर स्प्रे करा. नंतर यावर चारही बाजूला बेकिंग सोडा शिंपडा आणि काही वेळासाठी तसेच ठेवा. नंतर सावधगिरीने ब्रश करा किंवा व्हॅक्यूम करा.

 

Web Title :- Home Cleaning Tricks | pre diwali home cleaning hacks festivals decorations supplies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाची विजयी सलामी; द गेमचेंजर्स संघाचा तिसरा विजय!

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 82 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mumbai Drugs Case | आणखी एक मोठा ट्विस्ट ! समीर वानखेडेंवर NCB अधिकाऱ्याचा गंभीर आरोप; मलिकांना निनावी पत्र पाठवत, म्हणाले…