गृहखात्याची आमच्या सभांवर करडी नजर : अशोक चव्हाण

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन

मुख्यमंत्र्यांचे गृहखाते आमच्या प्रत्येक सभेवर करडी नजर ठेवून आहे. आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलतो ते लिहून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. पोलिसांनी आमची जासुसी करावी आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदूरबार येथे केले. काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा नंदुरबार जिल्ह्यात आल्यानंतर शहादा शहरातून महारॅली काढण्यात आली होती. त्यानंतर भव्य सभा झाली. या सभेत चव्हाण बोलत होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f3e87f3-ca05-11e8-8a46-d3ed45a059ad’]

नंदुरबारमधील काँग्रेसच्या या सभेला पृथ्वीराज चव्हाण, खासदार अशोक चव्हाण, आमदार नसीम खान, आमदार बाळासाहेब थोरात आणि जिल्ह्यातील कांग्रेसचे नेते उपस्थित होते. या सभेत नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्याबद्दल आपली भूमिका मांडली. मोदी सरकार खोट्या आश्वासनांनी जनतेची कशी फसवणूक करत आहे, यावर माहिती देण्यात आली.

नांदेड वनविभागाने केली धडक कार्यवाही तवेरा गाडी सह सागवान जप्त

यावेळी खासदार अशोक चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे गृहखाते आमच्या प्रत्येक सभेवर करडी नजर ठेवून आहे. आम्ही त्याच्याबद्दल काय बोलतो ते लिहून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. पोलिसांनी आमची जासुसी करावी आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही. राफेल घोटाळा, नोटबंदी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, अशा अनेक गोष्टींमुळे अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. या गोष्टी मोदी सरकार सत्तेत असूनही स्थिती सुधारु शकणार नाही, त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पायउतार करा व काँग्रेस पक्षाला निवडून आणा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

[amazon_link asins=’B078YQFXFR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d1c68a2-ca05-11e8-bd81-4fef309cb0af’]