प्रभारी होमगार्ड १ हजार घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – होमगार्डचे प्रभारी श्रीगोंदा तालुकाप्रमुख शनिदेव दत्तात्रय घोडके (वय ४१ वर्षे, रा.सिध्दार्थनगर ता. श्रीगोंदा, अ.नगर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एक हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. आज सायंकाळी नगर शहरात ही कारवाई करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे होमगार्ड असून त्यांना सेवेत पुर्नस्थापित करणेबाबत त्यांच्या कार्यालयाने आदेश काढले आहेत. तक्रारदार यांनी लोकसेवक प्रभारी होमगार्ड तालुका समादेशक श्रीगोंदा घोडके यांनी हजर करून घेण्यासाठी विनंती केली. लोकसेवक घोडके यांनी हजर करून घेण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास २ हजार दिले तरच हजर करून घेतले जाईल, असे सांगितले. तक्रारदार यांना हजर करून घेण्यासाठी दि. २४/०७/२०१९ रोजी २०००/-रूपयाची मागणी केली. १ हजार रुपये लाचेची मागणी पंच साक्षीदार समक्ष शनिचौक श्रीगोंदा येथे केली होती. सदर लाचेची रक्कम आज नगर शहरातील होमगार्ड कार्यालयाजवळील रूपवते महाविद्यालयचे गेट समोर पंच साक्षीदारांसमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे,  पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोहेकॉ. तनवीर शेख, पो.ना. रमेश चौधरी, पो.ना.विजय गंगुल, महीला पो.कॉ. राधा खेमनर आदींनी ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –

 

 

Loading...
You might also like