Home Loan ट्रान्सफर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, छोटी चूक सुद्धा पडू शकते महागात; जाणून घ्या

नवी दिल्ली : गृहकर्ज ट्रान्सफर (Home Loan) करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे जरूरी आहे. अन्यथा अशा स्थितीत थोडी जरी चूक झाली तरी ती महागात पडू शकते. आपले गृहकर्ज दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करण्यापूर्वी व्याजदरांबाबत (Interest Rate) माहिती गोळा केली पाहिजे. (Home Loan)

 

तुमच्या सध्याच्या बँकेच्या गृहकर्जाचा दर आणि दुसर्‍या बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर (Home Loan Interest Rate) यांच्या 0.25 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त फरक असेल तर या स्थितीत सुद्धा गृहकर्ज टान्सफर केले जाऊ शकते. यामुळे चांगली बचत होऊ शकते. (Home Lo
an)

 

याशिवाय गृहकर्जाच्या हप्त्याच्या कालावधीवर सुद्धा लक्ष दिले पाहिजे. जर तुमच्या गृहकर्जाची शिल्लक रक्कम जास्त असेल आणि तुम्हाला त्याचे हप्ते मोठ्या कालावधीपर्यंत द्यायचे असतील तर गृहकर्ज ट्रान्सफरच्या (Home Loan Transfer) स्थितीत लाभ होऊ शकतो. परंतु जर तुम्ही एक किंवा दोन वर्षासाठी गृहकर्ज ट्रान्सफर करणार असाल तर अशा स्थितीत तुमचा जास्त फायदा होणार नाही.

 

 

गृहकर्ज ट्रान्सफरच्या दरम्यान प्रोसेसिंग फी, अर्ज शुल्काशिवाय इतर अनेक शुल्क असतात जे सध्याची बँक आणि नवीन बँकेद्वारे वसूल केले जातात.
अशा स्थितीत हे खर्च सुद्धा जोडून सध्याच्या कर्जाशी याची तुलना करून हे पाहू शकता
की तुमचे लोन ट्रान्सफर करणे किती फायद्याचे आहे किंवा नाही.

 

याशिवाय तुमच्या सध्याच्या बँकेला सुद्धा व्याजदर कमी करण्यास सांगू शकता.
अनेकदा बँक वेळेवर ईएमआय भरणार्‍या ग्राहकांना व्याजदरात सूट देते.

 

गृहकर्ज ट्रान्सफरद्वारे तुम्ही फेस्टिव्ह सीझनमध्ये कमी व्याजदराचा फायदा घेऊ शकता.
यातून तुमचा EMI कमी होतो. कर्ज ट्रान्सफर करून तुम्ही टॉपअपचा फायदा सुद्धा घेऊ शकता.
याचा वापर तुम्ही कोणत्याही खर्चासाठी करू शकता.

 

जर तुम्हाला गृहकर्ज ट्रान्सफर करायचे असेल तर यासाठी ओळखपत्र, अ‍ॅड्रेस प्रूफ,
सॅलरी स्लिप आणि मागील 6 महिन्यांचे बँक अकाऊंट सारख्या अनेक कागदपत्रांची गरज भासू शकते.

 

Web Title :- Home Loan | keep these things in mind before transferring home loan slight mistake can be heavy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा