Home Loan Online Application | ‘होम लोन’साठी ऑनलाइन अप्लाय करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Home Loan Online Application | डिजिटल अ‍ॅडव्हान्समेंटने अनेक प्रकारचे फायनान्शियल ट्रांजक्शन (Home Loan Online Application) खुप सोपे केले आहे. यासाठी तुम्हाला कम्प्युटर किंवा स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. याद्वारे तुम्ही होम लोन तसेच इतर प्रकारच्या लोनसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता. तर दूसरीकडे ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खुप मोठी असते आणि यातून अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. अशावेळी होम लोनसाठी ऑनलाइन अप्लाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेवूयात (special tips for applying for a home loan online)…

 

कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

– होम लोन (home loan) साठी अर्ज भरताना प्रथम एलिजिबिलिटी (eligibility) तपासून घ्या.

– ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू (online application process) करण्यापूर्वी कागदपत्र तयार ठेवा. कागदपत्रांची यादी तयार ठेवा.

– मार्केटमध्ये उपलब्ध सर्व होम लोनचा रिसर्च करा. ठाम ठरवा की कोणते लोन घ्यायचे आहे, म्हणजे होम लोन, होम इम्प्रूव्हमेंट लोन, होम एक्सटेन्शन, लँड लोन घेत आहोत.

– पहिल्यांदा कर्ज घेणार्‍यांसाठी हे आवश्यक आहे की, लोन अ‍ॅप्लीकेशन प्रोसेस सुरू करण्यापूर्वी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) वाचून घ्या.

– कोणत्याही प्रकारच्या मनात आलेल्या प्रश्नासाठी ऑनलाइन चॅट सुविधेचा वापर केला जाऊ शकतो.

 

हे काम अजिबात करू नका

– पात्रता तपासल्याशिवाय कोणत्याही रँडम किंवा अनरियलिस्टिक लोन अमाऊंटसाठी अर्ज करू नका.

– लोन प्रोसेस एकदाच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, विविध टप्प्यात नको. अर्ज करण्यासाठी वेळ काढा आणि बसा.

– महत्वाचे कागदपत्र जमा करण्यास विसरू नका.

– कर्ज घेणार्‍याच्या सिबिल स्कोअरचा त्याच्या लोन अ‍ॅप्लिकेशनवर प्रभाव पडतो. यासाठी, कर्जासाठी अर्ज करताना सिबिल स्कोअरकडे दुर्लक्ष करू नका.

Web Title : Home Loan Online Application | while applying for home loan online these things keep in mind

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update