Home Loan Tax Deduction | मार्च 2022 पर्यंत होमलोनवर मिळू शकते 5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलत, जाणून घ्या कशी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Home Loan Tax Deduction : जर तुम्ही 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2020 च्या दरम्यान घर खरेदीचा विचार करत असाल आणि त्याची किंमत 45 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुमचे हे पहिले घर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. मार्च 2022 पर्यंत होमलोनवर 5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलत मिळवू शकता. (Home Loan Tax Deduction)

 

सरकारने अफोर्डेबल घर खरेदीसाठी होमलोनच्या व्याजाच्या पेमेंटवर 1.5 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॅक्स डिडक्शन मिळवण्याचा कालावधी वाढवून 31 मार्च 2022 पर्यंत केला होता.

 

इन्कम टॅक्स सेक्शन 80EEA च्या अंतर्गत तुम्ही टॅक्स सवलतीचा फायदा घेऊ शकता. हे एकत्र केले तर मार्च 2022 पर्यंत होमलोन (Home Loan) वर एकुण 5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळू शकतो. (Home Loan Tax Deduction)

 

प्रिन्सिपल अमाऊंटवर 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत

होमलोनच्या EMI मध्ये दोन भाग असतात. एक प्रिन्सिपल अमाऊंट (Principal Amount) आणि दुसरा होमलोनच्या प्रिन्सिपल अमाऊंटवर व्याजचा (Interest Amount). होमलोनच्या प्रिन्सिपल अमाऊंट रिपेमेंटवर इन्कम टॅक्सच्या सेक्शन 80C च्या अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलत मिळते. या सेक्शनमध्ये स्टॅम्प ड्यूटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेसचा सुद्धा समावेश आहे.

 

2 लाख रुपयापर्यंतच्या व्याजाच्या पेमेंटवर टॅक्स सवलत

इन्कम टॅक्सच्या सेक्शन 24(B) अंतर्गत होमलोनच्या व्याजाच्या पेमेंटवर एका आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलत मिळते.
मात्र, याची अट ही आहे की, ज्या आर्थिक वर्षात होमलोन घेण्यात आले आहे
ते आर्थिक वर्ष समाप्त झाल्यानंतर पुढील पाच वर्षांच्या आत कन्स्ट्रक्शनचे काम पूर्ण झाले पाहिजे.
जर असे झाले नाही, तर केवळ 30,000 रुपयांचे टॅक्स डिडक्शन घेऊ शकता. (Home Loan Tax Deduction)

 

अर्थमंत्र्यांकडून अपेक्षा

परंतु हे तिनही एकत्रित केले तर मार्च 2022 पर्यंत होमलोनवर 5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलत मिळवता येऊ शकते.
परंतु हे सुद्धा शक्य आहे की आगामी बजेटमध्ये मंत्री निर्मला सीतारामन हा कालावधी वाढवतील ज्यामुळे टॅक्सपेयर्सला मोठा दिलासा देता येऊ शकतो.

 

Web Title :- Home Loan Tax Deduction | home loan tax benefit can be claimed up to rupees 5 lakhs till march 2022 know details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा