Home Loan | प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी Pre-EMI आणि Full-EMI बद्दल जरूर जाणून घ्या, दोन्हीमध्ये आहे खूप फरक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Home Loan | तुम्ही अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल बिल्डर किंवा बँकेशी कधी बोलले असेल तर तुम्ही Full-EMI आणि Pre-EMI हे शब्द अनेक वेळा ऐकले असतील. हे दोन्ही मुदत कर्जाशी संबंधित आहे. सामान्यत: बँका गृह कर्जासाठी (Home Loan) Pre-EMI आणि Full-EMI असे दोन पर्याय देतात. परंतु Pre-EMI आणि Full-EMI या कॉन्सेप्ट बद्दल तुमची काय शंका असेल तर ती शंका आजच दूर करा.

 

Full-EMI आणि Pre-EMI म्हणजे काय?
EMI म्हणजे समान मासिक हप्ता. यात मूळ रक्कम आणि व्याज दोन्ही असतात. बँक तुमच्या कर्जाची संपूर्ण रक्कम बिल्डरला डिस्बर्स करते तेव्हा EMI सुरू होते. समजा तुम्ही घरासाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर तुम्हाला ताबा मिळाला आहे. आता ताबा मिळाल्यानंतर जो EMI सुरू होईल, त्याला Full-EMI म्हटले जाईल.

 

ज्यामध्ये, जेव्हा तुम्हाला तुमच्या घराचा ताबा अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी म्हणून मिळत नाही, तोपर्यंत भरलेल्या EMI ला Pre EMI म्हणतात.
समजा, तुम्ही फ्लॅटसाठी 50 लाख रुपयांचे होम लोन (home loan) घेतले, परंतु बांधकाम सुरू असल्यामुळे तुम्हाला सुरुवातीची काही वर्षे ताबा मिळाला नाही,
तर बँक बिल्डरला पूर्ण पैसे देणार नाही. जसजसे बांधकाम पुढे जाईल तसतसे बँक बिल्डरला पैसे देत राहील.
या कालावधीत तुम्ही भरलेल्या EMI ला Pre – EMI म्हणतात.

Full-EMI आणि Pre-EMI मधील फरक
Pre-EMI मध्ये, तुम्हाला फक्त डिस्बर्समेंटच्या रक्कमेवर सिंपल व्याज भरावे लागेल तर Full- EMIमध्ये तुम्हाला प्रिंसिपल आणि व्याज दोन्ही भरावे लागतील.
Pre- EMI जेव्हा बिल्डरला पहिले पेमेंट दिले जाते तेव्हापासून सुरू होते आणि ताबा मिळाल्यानंतर Full-EMI सुरू होते.
Pre-EMI भरल्यावर मूळ रक्कम कमी होत नाही, तर Full- EMI मध्ये मूळ रक्कम कमी होते.

 

 

Web Title :- Home Loan | what is pre emi vs full emi home loan property

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aadhaar Card Franchise | ‘आधार कार्ड’ची मोफत घेऊ शकता फ्रेंचायजी आणि करू शकता मोठी कमाई, जाणून घ्या कसे

 

Samantha Akkineni | राम चरणसोबतच्या Kissing सीनवर अभिनेत्री समांथाचे मोठं विधान; ‘लिपलॉक’चं सांगितलं सत्य

 

PPF Investment | नवीन वर्षात सुरू करा बचत आणि सुरक्षित गुंतवणूक, दरमहिना 1000 रु. जमा करून बनवा 12 लाखाचा फंड, जाणून घ्या पूर्ण योजना