हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी वापरा ‘हा’ होममेड स्क्रब, पहिल्याच वेळी दिसेल कमाल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या प्रत्येकाला असते. कोरडेपणामुळे डेड स्किन चेहर्‍याची चमक कमी करते. अशावेळी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणे सोपे वाटते. परंतु, आपल्याकडे एक असा उपाय आहे जो पुन्हा स्कीन निरोगी आणि सुंदर बनवू शकतो. यासाठी होममेड स्क्रब किचनमध्येच बनवून कशाप्रकारे विंटर स्किन केयर रुटीन फॉलो करू शकता ते जाणून घेवूयात…

आश्चर्यकारक आहे कॉफी स्क्रब
कॉफी आपल्या त्वचेसाठी खुप लाभदायक आहे. कॉफी स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला एका कपात 1 चमचा कॉफी आणि एक चमचा पाणी मिसळावे लागेल. अशाप्रकारे कॉफी ग्राऊंड स्क्रब तयार होईल. आता तो चेहर्‍याला आणि सर्कल मोशनमध्ये स्क्रब करा. 4-5 मिनिटे स्क्रब केल्यानंतर चेहरा स्वच्छ करा. ताबडतोब फरक दिसेल.

क्लिजिंग क्रिम आणि शुगर स्क्रब
शुगर स्क्रब बनवण्यासाठी एका कपमध्ये एक चमचा क्लिजिंग क्रिम घ्या आणि यामध्ये 2 मोठे चमचे साखार मिसळा. आता हे चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि सर्कल मोशनमध्ये स्क्रब करा. हे डोळ्यांच्या जवळपास लावू नका. नंतर चेहरा एका ओल्या कपड्याने स्वच्छ करा. यामुळे चेहरा ताजातवाना होईल.

खोबरेल तेल आणि लिंबूचा स्क्रब
खोबरेतेल आणि लिंबू दोन्ही आपल्या आरोग्यासाठी उपयोगी वस्तू आहेत. खोबरेल तेल त्वचेसाठी टॉनिकचे काम करते. तर लिंबू त्वचेला नरम आणि मुलायम बनवते. हा स्क्रब बनवण्यासाठी एका कपात एक चमचा खोबरेल तेल, जैतूनचे तेल, बदाम तेल, 2 चमचे साखर आणि 1 चमचा लिंबू रस मिसळा. हे चांगले एकजीव करून चेहर्‍यावर हळुहळु रगडा. चेहर्‍यावरून डेड स्कीन निघून जाईल आणि चेहरा क्लीन आणि ग्लो करताना दिसेल.