Coronavirus : ‘मास्क’ची कमतरता भासणारच नाही, ‘कोरोना’ व्हायरसला रोखण्यासाठी सरकारनं शोधला अनोखा ‘मार्ग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संक्रमणा दरम्यान देशात मास्कच्या टंचाईचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एक अनोखा मार्ग काढला आहे. सरकारला अपेक्षा आहे की, ही पद्धत वापरल्यानंतर कोणालाही मास्क खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरवर अवलंबून राहावे लागणार नाही.

घरीच बनवा आपले मास्क
हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण हाच सर्वात अनोखा मार्ग आहे. केंद्र सरकारने शनिवारी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सल्लामसलत केली आहे. सरकारने या व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लोकांना ‘घरी बनवलेले मास्क’ लावण्यास सांगितले आहे, विशेषकरून जेव्हा ते घरातून बाहेर जातात. शनिवारी जारी केलेल्या ‘चेहरा आणि तोंडा’चे रक्षण करण्यासाठी घरगुती संरक्षक आवरणांच्या वापराविषयी सल्लामसलत करताना’ सरकारने असे म्हटले आहे की, असे मास्क वापरल्याने मोठ्या प्रमाणात समुदायाचे रक्षण होईल आणि बर्‍याच देशांमध्ये सामान्य लोकांसाठी घरगुती मास्क फायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी फेस मास्क वापरणे आवश्यक आहे. पण मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने मास्कची टंचाई भासत आहे. इतके की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपल्या देशातील नागरिकांना कोणतेही नॉन-सर्जिकल मास्क घालण्याची सूचना दिली आहे.

सर्जिकल मास्कची सगळ्यांना आवश्यकता नाही : WHO
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसवर जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस महामारी दरम्यान सगळ्या नागरिकांना मास्क घालण्याची गरज नाही. सोबतच WHO ने हेही म्हटले की ज्या लोकांना सर्दी किंवा खोकला आहे, त्यांनीच मास्क घातले पाहिजे.

शनिवारी देशात कोविड -१९ च्या रुग्णांची संख्या वाढून २९०२ झाली आहे, तर या आजारामुळे मृतांचा आकडा ६८ वर पोचला आहे.