दहशतवादाला रोखण्यासाठी चाणक्य अमित शाहांचा ‘हा’ मास्टर प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादाला रोखण्यासाठी केंद्राने कठोर पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच केंद्र सरकारने एक नवा ग्रुप बनवला आहे. त्याला टेरर मॉनिटरिंग ग्रुप बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने टेरर मॉनिटरिंग ग्रुप बनवला आहे. जम्मू काश्मीरचे अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस (DGP) CID या ग्रुपची अध्यक्षता करेल. याशिवाय IB, NIA, CBI, CBIC, CBDT, ED हे सदस्य देखील या ग्रुपचे प्रतिनिधीत्व करतील.

टेरर मॉनिटरिंग ग्रुप आता सक्रिय झाल्याचे देखील सांगण्यात आले आहे. आता सर्व एजेन्सी काश्मीर खोऱ्यात दहशतवादाला फायनान्स करणाऱ्यांना लक्ष देऊन असतील. 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या दलावर पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्लात 46 जवान शहीद झाले होते. तर आताच अनंतनाग मध्ये सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे केंद्र सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी मोठे पाऊल उचलणार आहे.

SCO समिटमध्ये मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी मोदींनी स्पष्ट केले होते की, सगळ्या देशांनी दहशतवादबरोबर लढण्यासाठी एकत्र आले पाहिजे आणि दहशतवादावर मात करायला हवी. यावेळी त्यांनी श्रीलंकेत ईस्टर सन्डेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले होते.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’