ज्या डॉक्टरांनी केला ‘कोरोना’वर उपचार, त्यांना अमित शहा यांनी पत्र लिहून सांगितली ‘ही’ गोष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शहा यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल केले गेले होते. अमित शहा बरे झाल्यावर उपचारानंतर घरी परतले आहेत. आता अमित शहा यांनी आपले उपचार करणार्‍या डॉक्टरांना कृतज्ञतेचे पत्र लिहिले आहे.

वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटलमधील डॉक्टर सिद्धार्थ यांना अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनल शहा यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात अमित शहा यांनी लिहिले आहे की, कोरोना संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते.

अमित शहा यांनी डॉ. सिद्धार्थ यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, ”देवाच्या कृपेने आणि तुमच्या प्रयत्नांमुळे मी आता निरोगी होऊन माझ्या निवासस्थानी परत आलो आहे. गृहमंत्री म्हणाले आहेत की, या दोन आठवड्यात तुम्ही ज्या प्रकारे रात्रंदिवस माझी काळजी घेतली त्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत.”

ते म्हणाले आहेत की, तुमची सेवा, समर्पण आणि करुणेबद्दल मी व माझे कुटुंब तुमचे मनापासून आभारी आहोत. सोनल आणि अमित शहा यांनी डॉक्टरांचे आभार मानले आणि सांगितले की, आपण असेच समान भावनेने मानवतेची आणि देशाची सेवा करत रहा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like