HM अमित शहा यांना AIIMS मधून डिस्चार्ज, शनिवारी श्वासाचा त्रास होऊ लागल्यानं झाले होते अ‍ॅडमिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने एम्समध्ये अ‍ॅडमिट झालेले गृहमंत्री अमित शाह यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शाह यांना शनिवारी रात्री उशीरा सुमारे 11 वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

अमित शाह एम्सच्या कार्डियो न्यूरो टॉवरमध्ये दाखल होते. ते कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा देखरेखीसाठी (पोस्ट-कोविड ट्रीटमेंट) एम्समध्ये दाखल झाले होते आणि 31 ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर त्यांना पुन्हा श्वास घेण्यासंबंधी समस्या सुरू झाली होती. तेव्हा त्यांना शनिवारी एम्समध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते.

अ‍ॅडमिट असतानाही अ‍ॅक्टिव्ह होते शाह
अमित शाह एम्समध्ये अ‍ॅडमिट असतानाही काम करत होते. गुरुवारी शाह यांनी हॉस्पिटलमूधनच गुजरातच्या गांधीनगर लोकसभा क्षेत्रात 229 कोटी खर्चाच्या 24 बाय 7 पाणीपूरवठा योजनेचा शिलान्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला होता.

यापूर्वीही हॉस्पीटलमधून सांभाळले होते कामाकाज
गृहमंत्री अमित शाह मागील महिन्यात 2 ऑगस्टला कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, ज्यानंतर ते गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पीटलमध्ये दाखल झाले होते. 14 ऑगस्टला त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, त्याच्या 4 दिवसानंतरच 18 ऑगस्टला ते पोस्ट-कोविड केयरसाठी एम्समध्ये दाखल झाले. त्या दरम्यान त्यांनी हॉस्पीटलमधूनच मंत्रालयाचे कामकाज सांभाळले होते.