HM अमित शहांनी दिल्लीमध्ये सुरू केलं ‘डोर-टू-डोर’ कॅम्पेन, घरोघरी जाऊन दिली CAA संदर्भातील माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Act) बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने दारोदारी जाऊन या अभियानाची सुरुवात केली. या प्रसंगी गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीच्या लाजपतनगर येथे पोहोचले आणि तेथे त्यांनी पत्रके वाटली. या अभियानादरम्यान शाह यांनी अमर कॉलनीत अफगाणिस्तानातून आलेल्या शीख शरणार्थीयांची भेट घेतली.

या अभियानासाठी भाजपाने प्रमुख नेत्यांची यादी तयार केली असून या नेत्यांना वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करायची आहे. हे अभियान जवळपास १० दिवस चालणार असून या काळात जवळपास ३ कोटी परिवारांसोबत संपर्क साधण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या कायद्याबाबत विरोधांकडून होणाऱ्या अपप्रचाराला देखील थांबविण्याचा उद्देश या अभियानातून सफल होणार आहे.

पहिल्या दिवशी या अभियानात अमित शाह दिल्लीत होते तर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा गाझियाबाद येथे उपस्थित होते. तसेच राजनाथ सिंह लखनऊ, निर्मला सीतारामन जयपूर तर नितीन गडकरी हे नागपूर येथे अभियानाचे नेतृत्व करत होते.

याअगोदर भाजपा महासचिव अनिल जैन यांनी पत्रकारांना सांगितले की, भारतीय मुसलमानांनी नागरिकत्व कायद्याबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. मग ते NRP असो की मग NRC. तसेच त्यांनी स्पष्ट केले की भारताचा एक मात्र धर्म म्हणजे संविधान होय.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/