हलका ताप आल्यानंतर HM अमित शाह AIIMS मध्ये दाखल, नुकतेच ‘कोरोना’तून झाले होते बरे

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम त्यांची देखरेख करत आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह कोरानातून बरे झाले होते. रात्री उशीरा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले, येथे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

गृहमंत्री अमित शाह यांना रात्री उशीरा सुमारे 2 वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना जुन्या प्रायव्हेट वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखाली एक टीम त्यांची देखभाल करत आहे. त्यांना हलका ताप होता. यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले.

14 ऑगस्टला कोरोनातून बरे झाले
14 ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. कोरोना निगेटिव्ह होण्याची माहिती अमित शहा यांनीच दिली होती. यानंतर त्यांना मेदांता हॉस्पिटलमधून सोडण्यात आले होते. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. काल रात्री त्यांना हलका ताप होता.

2 ऑगस्टला कोराना रिपोर्ट आला पॉजिटिव्ह
अमित शाह मेदांता हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर 2 ऑगस्टला दाखल झाले होते. शाह कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना अनेकांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 12 दिवसानंतर म्हणजे 14 ऑगस्टला अमित शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

लोकांचे मानले होते आभार
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर अमित शाह यांनी म्हटले होते की, आज माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी ईश्वराचे आभार मानतो आणि या काळात ज्या लोकांनी माझ्या आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन माझे आणि कुटुंबाचे धाडस वाढवले त्यांचा मी आभार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आता काही दिवस आणखी होम आयसोलेशनमध्ये राहीन.