अर्थव्यवस्थेसंबंधी निर्मला सीतारमण ‘गंभीर’, ‘हे’ 8 मोठे निर्णय घेतल्याचं HM अमित शहांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे आता मोदी सरकारला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. यावर देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाष्य केले आहे. शहा यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ८ महत्वाचे निर्णय घेतले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते.

जीडीपी ४.५ वर घसरला आहे. अशा स्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोदी सरकार काय करत आहे? असा प्रश्न विचारला असता शहा म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपली जबाबदारी चांगल्यापद्धतीने पार पाडत आहेत. जीडीपी ४.५ टक्क्यांवर आला असला तरी पुढे ही स्थिती राहणार नाही. सितारमण यांनी अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी ८ मोठी पावले उचलली आहेत. याचा सकारात्मक परिणाम येत्या काळात अर्थव्यवस्थेवर होऊन अर्थव्यवस्था पुन्हा तेजीत येईल. जगभरात मंदी असून त्याचा परिणाम भारतावरही होत आहे.

हे आहेत ८ निर्णय
मागील सप्टेंबर महिन्यात निर्मला सितारमण यांनी कॉरपोरेट टॅक्‍समध्ये कपात, सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक, प्रत्येक शहरात कर्ज मेळावे, टास्क फोर्सची निर्मिती, रियल एस्‍टेट क्षेत्रासाठी बूस्‍टर डोस, बँकांचे विलिनिकरण, निर्यात वाढविण्यावर भर आणि मेगा शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन, असे आठ निर्णय घेतले होते, याचा उल्लेख शहा यांनी आठ मोठे निर्णय म्हणून या मुलाखतीमध्ये केला.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/