ताज्या बातम्याराष्ट्रीय

चिंताजनक ! देशातील 90 % पोलिसांना करावी लागते 12 तासाची ड्युटी : गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये पोलीस स्मृती दिनानिमित्त गृह मंत्री अमित शहा यांनी पोलिसांबाबत एक महत्वाचे विधान केले आहे ते म्हणतात, आपण पोलिसांच्या कार्याला देखील बाकी सरकारी कामांप्रमाणे पाहतो मात्र वास्तवात ते तसे नसते. पोलीस प्रशासनाचे असो किंवा सीमेवर रक्षणाचे काम असो, रस्त्यावर ट्रॅफिकचे काम असो किंवा अन्य मोठ्या संकटांशी सामना करणे असो अशी कामे केवळ पोलिसच करू शकतात.

पोलिसांच्या कामावर बोलले गृहमंत्री –
गृहमंत्री अमित शहा म्हणाले, धार्मिक दंगलीतून मुक्त करून शांततेच्या दिशेने पुढे जाणे, दहशतवादाविरोधात आवाज उठवून देखील संघर्ष करून शांती निर्माण करणे तसेच नक्षलवादी भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सुद्धा पोलिसांचेच योगदान असते.

34,844 पोलीस कर्मचाऱ्यांना वीरमरण –
जम्मू काश्मीरमध्ये लढाई करून ते भारतात ठेवण्यामध्ये सुद्धा अशाच धाडसी लोकांचा समावेश आहे. यासाठी 34,844 पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य दक्षता दाखवत आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. आज पर्यंत आपण असा अनेक कार्यकाळ पाहिला आहे ज्यावेळी पोलिसांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन देशाचे रक्षण केली आहे. मी अशा पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करतो असे अमित शहा यावेळी म्हणाले.

पोलिसांचे स्मारक बनवण्यामागे मोदींची भूमिका –
अमित शहा म्हणाले आज हे जे पोलीस स्मारक बनवले आहे त्या मागची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आधी देखील स्पष्ट केलेली आहे. हे केवळ स्मारक राहणार नसून येथून पोलिसांची अनेक कामे चालतील तसेच या स्मारकामुळे पोलिसांच्या बलिदानाची कथा लोकांपर्यंत पोहचत राहिल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.

देशातील अनेक मुलं आणि टुरिस्ट लोक या क्षेत्राकडे एक तीर्थक्षेत्र म्हणून पाहतील आणि शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी येतील. अशाप्रकारे स्मारकांचा मान ठेवण्यासाठी सरकार द्वारा अनेक योजना सुद्धा आखण्यात आल्या असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

1 लाख लोकसंख्येमागे 144 पोलीस –
अमित शहा म्हणाले सध्या 1 लाख लोकसंख्येमागे 144 पोलीस कर्मचारी आहेत. यामुळे 90% कर्मचारी 12 तासापेक्षा अधिक काम करतात आणि तीन चथुर्थांश पोलीस कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देखील घेता येत नाही. या बाबतची सर्व परिस्थती जनतेला माहिती असणे आणि त्यांनी ती समजून घेणे देखील गरजेचे असल्याचे अमित शहा यांनी यावेळी नमूद केले.

Visit  :Policenama.com

Back to top button