गृहमंत्री अमित शहांच्या कारवाईमुळे ISIची उडाली ‘भंबेरी’, बनवला ‘हा’ नवीन ग्रुप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने (ISI) जम्मू-काश्मीरमध्ये एक नवीन फुटीरतावादी गट तयार केला आहे. काश्मीरमधील काही फुटीरतावादींच्या मदतीने पाकिस्तानने गुप्तपणे हा गट तयार केल्याची माहिती गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरशाद अहमद मालिक याला या नव्या फुटीरतावादी गटाचा म्होरक्या बनवण्यात आला आहे. तो लष्कराविरोधात काम करणारा दहशतवादी आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सेना आणि सुरक्षा दलांच्या विरोधात मोठ्या कारवाया करण्याची कामगिरी या गटाला देण्यात आलेली आहे.

दहशतवाद्यांविरोधात सक्त कारवाई
गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यापासून अमित शाह यांचे जम्मू-काश्मीरवर विशेष लक्ष आहे. मागील काही दिवसांपूर्वी सुरक्षा दले आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे की दहशतवाद्यांविरोधात सक्त कारवाई केली जाईल.

काही दिवसांपासून कश्मीरमध्ये एनआयए समवेत अनेक एजन्सींनी भ्रष्टाचार आणि दहशतवादी निधीच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. यामुळे दहशतवादी हादरले आहेत. एनआयएने मर्सरत आलम, शब्बीर शाह, आसिया अंद्राबी यांसारख्या फुटीरतावादी नेत्यांना जेलमध्ये टाकले आहे. त्यामुळे काश्मीरमधील आतंकवादी संघटना खिळखिळ्या झाल्या आहेत.

यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे ‘ऑपरेशन ऑल आउट’ चालू आहे. यावर्षी १०० पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले आहेत. त्यामध्ये लष्कर-ए-तोइबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

गर्भपिशवी काढावी की काढू नये ? काही समज-गैरसमज

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी