आता आधार, पासपोर्ट आणि ‘DL’साठी एकच ओळखपत्र, गृहमंत्री अमित शाहांचा प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशात एक ओळखपत्र आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे आधार कार्ड, आणि मतदान कार्ड हे एकच केले जाणार आहे. तसेच 2021 मध्ये होणारी जनगणना देखील मोबाईल ऍपद्वारे केली जाणार आहे. त्यांनी याविषयी बोलताना म्हटले कि, आधार कार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक, मतदान कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स या सर्वांसाठी एकच कार्ड असावे. त्यामुळं लवकरच हि पद्धत येऊ देखील शकते.

याविषयी अधिक बोलताना, गृहमंत्री म्हणाले कि, अशी सिस्टीम हवी कि, समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपोपाप त्याची नोंद हि पॉप्युलेशन डेटामध्ये व्हायला हवी. तसेच आम्ही देशातील सर्व ओळखपत्रांसाठी एकच कार्ड असण्यावर देखील काम करत आहोत.

ऍपद्वारे होणार जनगणना

अमित शहा यांनी म्हटले कि, जनगणना हे काम काही कंटाळवाणे नाही. याद्वारे सरकारला योजना लागू करण्यासाठी मदत होत असते. राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अनेक प्रकारे केंद्र सरकारची मदत करत असते. त्यामुळे देशात पहिल्यांदा ऍपद्वारे जनगणना घेण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Visit : Policenama.com