गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण ! अमित शहा यांची दुसर्‍यांदा नाही झाली टेस्ट, मनोज तिवारींनी हटवलं ट्विट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती देणारे ट्विट भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी हटवलं आहे. दरम्यान, अमित शहा यांची दुसर्‍यांदा तपासणी झाली नसल्याचं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यापुर्वी आज दिल्लीचे भाजपाचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांनी ट्विट करून अमित शहा यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याबाबत सांगितलं होतं.

2 ऑगस्ट रोजी गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून अमित शहा हे गुरूग्राममधील मेदांता हॉस्पीटलमध्ये दाखल झाले होते. मेदांता हॉस्पीटलमधील डॉ. सुशीला कटारिया यांच्या नेतृत्वाखालील टीम अमित शहा यांची देखरेख करत आहे. त्यावेळी अमित शहा यांनी ट्विट करून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना टेस्ट करून घेण्याबाबत आवाहन केलं होतं. आता गृह मंत्रालयाकडूनच अमित शहा यांची दुसर्‍यांदा कोरोना टेस्ट झाली नसल्याचं स्पष्टीकरण आल्यानंतर मनोज तिवारी यांनी स्वतःचं ट्विट हटवलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like