गृह मंत्री अमित शहा यांची ‘कोरोना’ टेस्ट आली निगेटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची कोरोना व्हायरसची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं आहे.

काही दिवसांपुर्वी अमित शहा यांनी आपली कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अमित शहा हे रूग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, त्यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

मी ईश्वराचे आभार मानतो आणि ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच माझ्या कुटुंबियांना आधार दिला त्यांचा मी आभारी असल्याचं अमित शहा यांनी ट्विट केलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस मी आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं देखील अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like