आता गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले, केव्हा कोरोना संकटातून रूळावर येईल Indian Economy

नवी दिल्ली : कोरोना संकटादरम्यान आता भारतीय अर्थव्यवस्था हळुहळु सुधारण्याच्या दिशेने जात आहे. देश-विदेशातील अनेक संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटातून रूळावर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. आता केंद्रीया गृहमंत्री अमित शाह यांनी आशा व्यक्त केली की, ऑक्टोबर-डिसेंबर 2020 म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत सकल स्थानिक उत्पादनाचा (जीडीपी) वृद्धी दर सकारात्मक राहील. शाह यांनी एका कार्यक्रमानंतर सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी मेहनत करत आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या आणि दुसर्‍या तिमाही दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे.

पीएम मोदींनी कोरोना काळात चांगले धोरण अवलंबले
गृहमंत्री शाह यांनी म्हटले की, जागतिक महामारीमुळे आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन पॅकेजची सुद्धा घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 महामारीच्या काळाचा वापर चांगली धोरणे बनवण्यासाठी केला आहे. या काळात अर्थव्यवस्थेवर मोठ्या कालावधीसाठी होणार्‍या परिणामाकडे विशेष लक्ष दिले आहे. पीएम मोदी यांनी कृषी, वीज, औद्योगिक धोरणात सुधारणांवर काम केले, जेणेकरून विकासाचा वेग कायम राहील.

दुसर्‍या तिमाहीत वेगाने घटला जीडीपी
अमित शाह यांनी म्हटले की, पीएम मोदी यांनी गरीबांसाठी 20 लाख कोटी रूपयांचे मदत पॅकेज सुद्धा दिले. ताजे जीडीपी आकडे पाहिले तर आपण केवळ 6 टक्केने मागे आहोत. त्यांनी आशा व्यक्त केली की, ऑक्टोबर-डिसेंबर 2020 तिमाहीत जीडीपीचा वृद्धी दर सकारात्मक होईल.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लवण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल-जून 2020 तिमाहीत जीडीपीत 23.9 टक्केची घसरण नोंदली गेली होती. यानंतर दुसर्‍या तिमाहीत म्हणजे जुलै-सप्टेंबर 2020 च्या दरम्यान ही घसरण कमी होऊन 7.5 टक्के झाली.