नितीन गडकरींचे ‘खच्चीकरण’ ! ‘एअर इंडिया’च्या संदर्भातील ‘त्या’ समितीतून गडकरी ‘OUT’ तर अमित शाह ‘IN’ !

दिल्ली : वृत्तसंस्था – एअर इंडियात निर्गुंतवणूकीवरील मंत्रीगटाचे पुन्हा एकदा गठण केले आहे. या गटाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री अमित शाह करतील. या पॅनलमधून केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आले आहे. एअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीसाठी ते काम करतील. यात गटात आता चार मंत्री – अमित शाह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल आणि नागरी उड्डनमंत्री हरदिप सिंह हे सहभागी असतील.

या निर्गुंतवणूक मॉडेलवर नवे मंत्री काम करतील. या पॅनलचे नाव ‘इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटिव मेकेनिज्म’ ठेवण्यात येईल. पहिल्यांदा यासाठी २०१७ साली समिती गठित करण्यात आली होती. तेव्हा या पॅनलमध्ये ५ लोक सहभागी झाले होते. ज्याचे नेतृत्व अरुण जेटली करत होते. इतर सदस्यांमध्ये तत्कालीन मंत्री नागरिक उड्डान मंत्री अशोक गजपति राजू, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पीयूष गोयल आणि रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांचा समावेश होता.

आर्थिक संकटात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियात निर्गुंतवणूकासाठी सरकार व्यापक तयारी करत आहे. यासाठीची निर्गुंतवणूक प्रक्रिया सरकार लवकरच सुरु करेल. यासाठी ‘कॅबिनेट कमिटी ऑन इकोनॉमिक अफेयर्स’ कडून ‘एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटिव मॅकेनिज्म’चे गठण करण्यात आले आहे. तर आता AISAM मध्ये निर्गुंतवणूकची प्रक्रिया पुढे वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

सरकारने जारी केलेल्या समर्थनात परिणाम स्वरुपात एअर इंडियाचे आर्थिक प्रदर्शन सुधारत आहे. AISAM च्या शिफारसीच्या मते, सरकार आता कंपनीच्या निर्गुंतवणूकीच्या प्रक्रियेत पुढे नेण्यात येणार आहे.

 

Loading...
You might also like