‘दलित कुटुंबासोबत भोजन हा तर शहांचा पॉलिटिकल स्टंट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   होऊघातलेल्या आगामी निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह सध्या पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते येथे समाजातील वेगवेगळ्या नेत्यांसोबत सभा घेणार आहेत. अमित शाह हे निवडणुकीसाठी पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. शहा हे बांकुडा जिल्यातील चतुधी येथे एका कुटुंबासोबत जेवण करणार आहेत.

मटुआ हा समाज पूर्व पाकिस्तानमधून येतो. त्यांची मागणी ही सुधारित नागरिकत्व कायद्याअंतर्गत नागरिकत्व मिळविण्याची आहे. या समाजाने २०१९ साली भाजपला मते दिली होती. या समाजातील एका कुटुंबासोबत जेवणार आहेत. ते हा मुद्दा या निवडणुकीत लावून धरणार आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या या निवडणुकीत सीसीए हा मुद्दा मध्यवर्ती असणार आहे. परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याला मोठ्याप्रमाणात विरोध केला होता.

…हा तर पॉलिटिकल स्टंट

अमित शाह यांनी या आधीही दलित कुटुंबासोबत जेवण केलं होतं. २०१६ मध्ये आदिवसी कुटुंबासोबत जेवण केलं होतं हा तर पॉलिटिकल स्टंट आहे यात काही खास नाही. केवळ बंगालमध्ये कलम ३५६ ची मागणी करण्यासाठी हा दौरा आहे बाकी काही नाही. पण भाजपात अंतर्गत कलह चालू आहे. कलम ३५६ च्या मुद्यावर त्यांच्यात मतभेद आहेत.

परंतु पक्षात सगळं अलबेल आहे, असा भाजपचा दावा आहे.