गृहमंत्री अमित शहा यांनी एका आठवडयात केली ‘कोरोना’वर मात, निगेटिव्ह आला रिपोर्ट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची कोरोना व्हायरसची टेस्ट निगेटिव्ह आल्याबाबतचं ट्विट भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी केलं आहे. काही दिवसांपुर्वी अमित शहा यांनी आपली कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अमित शहा हे रूग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान, त्यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचं आता भाजपाच्या खासदारानं ट्विट करून सांगितलं आहे.

कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं अमित शहा अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळयास देखील उपस्थित राहू शकले नव्हते. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याबाबत आवाहन केलं होतं. मात्र, आता अमित शहा यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like