राज्याचे गृहमंत्री भडकले, ‘त्या’ सर्वांना दिली कडक शब्दात ‘तंबी’

मुंबई : पोलीनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सैन्य तैनात करण्यात येणार असल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी (दि.28) दिला. अनिल देशमुख यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. सध्या मुंबईत अफवा पसरवण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी ट्विट करून अफवा पसरवणाऱ्यांना तंबी दिली आहे.

ते म्हणाले की, आज गृह मंत्रालयाच्या लक्षात आले आहे की, काही गन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्ती नागरिकांमध्ये दहशत आणि असंतोष निर्माण करण्यासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट बातम्या आणि अफवांची एक मोही चालवत आहेत. कोरोना महामारी ही देश आणि महाराष्ट्राच्या समोर उभी ठाकलेली एक मोठी सार्वजनिक आरोग्य आपदा आहे. अशा परिस्थितीत अफवा पसरवली जात आहे. ज्यामध्ये भारतीय सैन्य मुंबई व इतर शहरांवर संपूर्ण संचार बंदी लागू करण्यासाठी तैनात होणार आहे.

या संदेशात लोकांना या कालावधीत भाजीपाला, किराणा आणि दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सांगितले जात आहे. ही बातमी खोटी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवून नये किंवा इतरांना फॉरवर्ड करू नये, कारण यामुळे समाजात उगाचच घबराट पसरते.

महाराष्ट्र सरकार कोरोना विरुद्ध लढाईस वचनबद्ध आहे आणि या लढ्यातील धोरणात्मक निर्णयाबाबत नागरिकांनी वेळोवेळी राज्य सरकार विश्वासात घेत आले आहे. अशा अफवा पसरवल्यास आयटी कायदा आणि आयपीसी या दोन्ही तरतुदी नुसार दंड आणि शिक्षा होऊ शकते. महाराष्ट्र सायबर विभाग या मुद्याकडे बारकाईने पहात आहे आणि यापूर्वीच त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाच्या चौकशीत असे आढळून आले आहे की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 12 मुख्य युजर आयडी 8 मे 2020 पासून आजपर्यंत या अफवा, खोट्या बातम्या पसरवत आहे. अशा हँडल विरुद्ध सीआरीपीस सेक्शन 149 अंतर्गत कायदेशीर चेतावणी देण्याच्या स्वरुपात महा सायबरने यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत. एफबी, ट्विटर या सारख्या प्लॅटफॉर्मवरील पोस्ट काढून घ्या, असे आवाहन करताना त्यांनी अशा लोकांची खाती स्थगित करण्याचे आदेश दिले असून संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like