नव्या गृहमंत्र्यांना पोलीस आयुक्तांकडून ‘ब्रिफींग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात गाजलेल्या एल्गार परिषद प्रकरणाचे ब्रिफींग आज राज्याचे नवीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले. यासोबतच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील एकूणच कायदा सुव्यवस्थेचाही त्यांनी धावता आढावा घेतला.

राज्याचे गृहमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अनिल देशमुख हे प्रथमच सोमवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांचे पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी यांची दुपारी धावती बैठक पार पडली. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, ही 10 ते 15 मिनीटांची बैठक झाली. यावेळी देशमुख यांनी एल्गार प्रकरणाची सध्य परिस्थिती तसेच त्यासंबंधी माहिती घेतली गेली. त्यासोबतच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील एकूणच परिस्थिती, गुन्हेगारी व पोलीसांबाबत विचारपूस केली. या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे बारामतीला रवाणा झाले. ते आज पुणे मुक्कामी असल्याचे सांगण्यात येते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/