गृहमंत्री अनिल देशमुख यांचा स्पष्ट इशारा ! उद्या एप्रिल फूल कराल तर….

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. देशात देखील कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्या 1 एप्रिल आहे. अशा वेळी एप्रिल फुल करण्याच्या विचारात कोरोना व्हायरस संबंधित खोटे, अफवा पसरवणारे मेसेज व्हायरल होऊ शकतात. याचीच खबरदारी घेऊन राज्य सरकारने असे मेसेज व्हायरस करणाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.

देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. अशा स्थितीत लोक घरी रिकामे असल्याने व्हॉट्सअॅपवर कोरोना संबंधित मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उद्या 1 एप्रिल तारीख आहे. त्यात एप्रिल फुल करणाऱ्यांचे प्रमाण वाढेल. यामुळे कोरोनासंबंधित खोटे आणि चुकीची माहिती देणारे मेसेज व्हायरल होऊ शकतात परंतु असे केल्याचे आढल्यास त्या मेसेज व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईचा करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, उद्या 1 एप्रिल आहे, एप्रिल फुल करण्याचा दिवस. परंतु सध्याची परिस्थिती पाहता मी सर्वांना आवाहन करतो की कोणतेही अफवा, चुकीची माहिती पसरवू नका. जे कोणी अशी अफवा पसरवेल त्यांच्यावर कठोर करावाई करण्यात येईल.

1 एप्रिलच्या पार्श्वभूमीवर लोक एकमेकांना एप्रिल फुल करण्याच्या विचारात असतील, असे असले तरी अशा काळात कोरोनासंबंधित चुकीची माहिती देऊन कोणीही एकमेकांना एप्रिल फुल करणं टाळावचं. असे काही केल्यास ते तुमच्या अंगलट येऊ शकते. तसेच व्हॉट्सअॅपवर देखील एकमेकांना एप्रिल फुल संबंधित मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घ्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असेही सांगण्यात येत आहे की व्हॉट्सअॅप ग्रुपवर असे काही मेसेज फिरत असल्याचे आढल्यास ग्रुप अॅडमिन आणि मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते.