दिल्लीतील हिंसाचाराबाबत सुप्रिया सुळेंनी केलं मोठं विधान, म्हणाल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व विधेयकाच्या दुरुस्तीवर दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात एवढे गंभीर प्रश्न असताना दिल्लीचे पोलीस प्रशासन ज्यांच्या अखत्यारीत काम करते ते गृहमंत्री झारखंड प्रचारात व्यस्त आहेत. याकडे सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले. हे सरकार केंद्रातले निवडणूक ते निवडणूक आणि फक्त प्रचारात व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेचं सुख दु:ख यांच्यासाठी वेल नसतो असेहे सुळे म्हणाल्या.

पुण्यात सिंचन भवनात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला, त्या म्हणाल्या की, अतिशय भयानक परिस्थिती आहे. दिल्लीचे पोलीस हे केंद्र सरकारचे असतात. हे गृहमंत्रालयाचे अजून एक अपयश आहे. इथे भारतात इतके प्रश्न गंभीर असताना, दिल्लीत बस जाळत असताना देशाचे जबाबदार व्यक्तिमत्व आणि गृहमंत्री हे झारखंडच्या प्रचारात आहेत, हे दुर्दैवी आहे.

दिल्लीत होत असलेला हिंसाचार पहिला थांबला पाहिजे, ज्या भागात आंदोलन केल्यावर लाठीचार्ज होत असेल आणि ते ही कॉलेजमध्ये घुसून होत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. देशासाठी घातक आहे, असे सांगताना राजधानी दिल्लीतील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/