पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केल दु:ख, म्हणाले – ‘घरातील सदस्य गमावला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असलेले पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे बुधवारी (दि. 17) रात्री अपघाती निधन झाले. नांदगाव फाटा येथे त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने जबर धडक दिली. यात नारनवरे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गृहमंत्री देशमुख यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत नारनवरे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य गमावला आहे, असे म्हणत गृहमंत्री देशमुख यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. त्यांनी या सोबत संजय नारनवरे यांचा फोटोही शेअर केला आहे.