Sangli News : गृहमंत्र्याकडून सांगली जिल्हा पोलीस दलाचे ‘कौतुक’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मागच्या दोन दिवसामध्ये जत तालुक्यातील शेगाव येथील सोने व्यापारास सव्वादोन कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन पळून गेले होते. यामुळे तब्बल सव्वादोन कोटी रुपयांच्या दरोड्याचा २४ तासात छडा लावून सर्व मुद्‌देमाल हस्तगत केल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगली जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले. आणि पोलिसांचे अभिनंदनही केले आहे.

शेगाव येथीलसोने व्यापारास सव्वादोन कोटी रुपये किमतीचे सोने देण्यास चाललेला व्यापारी व त्याच्या साथीदाराच्या डोळ्यात चटणी फेकून चार किलो ५३० ग्रॅम वजनाचे सोने पळवून नेण्यात आले होते. एलसीबीसह तीन पथकांनी संयुक्त कारवाई करत २४ तासात पाच जणांना अटक करत शंभर टक्के मुद्देमालही हस्तगत केला होता. तसेच सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या प्रकरणाचा तातडीने छडा लावला होता. त्याबद्दल गृहमंत्र्याकडून पोलिस दलाचे अभिनंदन करण्यात आले आहे.