पोलिस जनतेशी कसे वागतात? जाणून घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी केला एकाला कॉल, पण ‘तो’ निघाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलीस जनतेशी कशा प्रकारे वागतात .त्यांना उत्तम सेवा देतात का? हे जाणून घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील(Dilip Walse Patil) यांनी एका व्यक्तीला फोन लावला. त्याच्याकडूनच पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने पोलिसांचे काम उत्तम असल्याची पावती दिली. पण गृहमंत्र्यांनी ज्या व्यक्तीला फोन लावला होता तो निघाला राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता. यावर तुमचे पद सांगितल्यामुळे तुम्हाला पोलिसांकडून चांगली वागणूक दिली का? अशी मिश्किल टिप्पणी गृहमंत्र्यांनी केली.

Pune : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील विद्यानगर भागातील ‘विपूल’ बंगल्यावर पोलिसांचा छापा; जुगार खेळाताना आढळले नामांकित अन् राजकीय व्यक्ती, कारवाई सुरू

पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याबरोबरच त्याविषयी चर्चा करण्यासाठी गृहमंत्री वळसे पाटील शुक्रवारी आयुक्तालयात आले होते. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांचे काम जाणून घेण्यासाठी काही विभागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आदी उपस्थित होते. सेवाप्रणाली कार्यालयातील समन्वय कर्मचारी पूजा भगत यांनी एका अर्जदाराला फोन केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्याशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी अर्जदाराला दिली. एखाद्या व्यक्तीने पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना योग्य ती सेवा अन् मदत दिली जाते का? ते समाधानी आहेत का? याची तपासणी करण्यासाठी वळसे पाटीलांनी एका व्यक्तीला फोन लावला. रमेश राऊत असे त्यांचे नाव होते. पोलीस व्हेरीफिकेशसाठी मुंढवा पोलीस ठाण्यात गेलो होतो. पोलिसांनी खूप चांगली सेवा दिल्याचे त्यांनी सांगताच तुमचे पद बघून चांगली वागणूक दिली का? अशी विचारणा करताच कार्यकर्ता हसला.

केवळ इम्यूनिटी मजबूतच नव्हे तर केस गळती देखील थांबते पांढर्‍या कांद्याच्या सेवनामुळं, जाणून घ्या हैराण करणारे फायदे

दुर्दैवी ! उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यु 

Immunity Booster Kadha : संसर्गापासून मुक्त होण्यास ‘या’ औषधी वनस्पतींचा काढा मोठी मदत करेल; इतर देखील अनेक फायदे, जाणून घ्या

कामाची गोष्ट ! देशातील कोणत्याही कोपर्‍यात बसून दिल्ली AIIMS च्या डॉक्टरांचा घ्या सल्ला, जाणून घ्या हेल्पलाईन नंबर