NPR साठी कोणतीही कागदपत्रे तसेच बायोमेट्रिक माहितीची आवश्यकता नाही, गृह मंत्रालयानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Register) बाबत होणाऱ्या विरोध प्रदर्शनाच्या वेळीच गृह मंत्रालयाने माहिती दिली की, एनपीआर अपडेटसाठी कोणतीही कागदपत्रे किंवा बायोमेट्रिक देण्याची गरज नाही. पश्चिम बंगालमध्ये असे प्रश्न उपस्थित केले जात होते, ज्यावर प्रतिक्रिया देताना गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले की NPR साठी कोणत्याही कागदपत्रे किंवा बायोमेट्रिकची मागणी केली जाणार नाही.

त्याचबरोबर NPR संबंधित वेगवेगळ्या प्रश्नांच्या फॉर्मला लवकरच अंतिम रूप दिले जाणार आहे. तसेच हे स्पष्टपणे सांगण्यात आले की या फॉर्मसह किंवा प्रश्नांमध्ये कोणतीही कागदपत्रे देण्यास सांगितले जाणार नाही, तसेच कोणालाही बायोमेट्रिक माहिती मागितली जाणार नाही.

विशेष म्हणजे सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनपीआर बाबत देशभरात सर्वत्र निदर्शने केली जात आहेत. हा विरोध पाहता एनपीआरचे सुरु झालेले काम थांबविण्यात आले आहे. पश्चिम बंगाल आणि केरळने एनपीआर ला अपडेट करण्याचे काम सध्या तरी थांबवले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/