CISF मध्ये होणार 1.20 लाख जवानांची भरती, सेवानिवृत्तांना मिळणार संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : सीआईएसएफ मुख्यालयाकडून २७ में ला संख्या वाढविण्यासाठी एक प्रपोजल केंद्रीय गृहमंत्रालयात पाठविण्यात आले होते. सीआईएसएफ ची मागणी वर विचारविनिमय करण्यासाठी गृह मंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली २३ सप्टेंबर रोजी एक बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, सीआईएसएफ ची संख्या १.८ वरून ३ लाख पर्यंत करण्यात येईल.

CISF च्या प्रस्तावाला गृह मंत्रालयाने दाखवला हिरवा झेंडा

कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ५ वर्षासाठी केल्या जाणार नियुक्त्या
गृह मंत्रालय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच सीआईएसएफ ला कॉमर्शियल फोर्स बनवण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहे. यासाठी एक खास प्रपोसल देखील बनविले गेले आहे. त्यानुसार सीआईएसएफ मध्ये पहिल्यांदाच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केली जाणार आहे. आणि जागांची संख्या ही १.८० वरून ३ लाख पर्यंत वाढविली जाणार आहे.

कॉन्ट्रॅक्टच्या आधारे ५ वर्षाकरिता ही नियुक्ती केली जाणार आहे. यात सैन्य व निमलष्करी दलाच्या सेवानिवृत्त जवानांना संधी देण्यात येणार आहे. १८ नोव्हेंबर ला सीआईएसएफ मुख्यालयाकडून बालाच्या स्पेशल डीजी, एडीजी आणि सेक्टर आईजी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. यात असाही उल्लेख करण्यात आला आहे की सीआईएसएफ च्याअधिकाऱ्यांनी खाजगी क्षेत्रातील मोठया कंपन्या आणि कारखान्यात देखील जाऊन खात्री करावी की तेथे सीआईएसएफ बलाची आवश्यकता आहे किंवा नाही.

अमित शहांनी दाखविला हिरवा झेंडा
सीआईएसएफ मुख्यालयाकडून या वर्षी २७ में ला संख्या वाढविण्यासाठी एक प्रपोजल केंद्रीय गृहमंत्रालयात पाठविण्यात आले होते. यामध्ये सुरक्षा बलातील जागांची संख्या ही १.८० वरून ३ लाख पर्यंत वाढविली जावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच या प्रपोसल मध्ये चार रिजर्व बटालियन स्थापित करण्याचा देखील प्रस्ताव होता. सीआईएसएफ च्या मागणीवर विचारविनिमय करण्यासाठी गृह मंत्रालयात २३ सप्टेंबर ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, सुरक्षा बलाची संख्या १.८० वरून ३ लाख पर्यंत करण्यात यावी.

नवीन भरतीप्रक्रियेसाठी दोन फॉर्मूले
मिळालेल्या सूत्रांनुसार गृहमंत्रालयाने या बाबतीत दिशानिर्देश प्रसारित केले आहेत. नवीन भरतीसाठी दोन सूत्र ठरविण्यात आले असून पहिले सूत्र म्हणजे नवीन भरती हि कॉन्ट्रॅक्ट च्या आधारे होणार असून यासाठी सैन्य व निमलष्करी दलाच्या सेवानिवृत्त जवानांकडून अर्ज घेण्यात येतील. आणि दुसरे म्हणजे, सुरक्षा बलाचा फॉर्मुला ३:२ च्या आधारे राहणार. यानुसार, सुरक्षा बलात तीन जवान कायमस्वरूपी सेवा देणार तर दोन जवान काँट्रॅक्टच्या आधारे असतील.

२२ नोव्हेंबर पर्यंत मागीतला रिपोर्ट
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी एडीशनल सेक्रेटरी (पोलिस) आणि बलाचे स्पेशल डीजी (हेडक्वार्टर) यांच्यात बैठक झाली. यामध्ये प्रपोसल पुढे पाठविण्यासाठी रणनीती बनविण्यात आली. त्यानंतर १५ नोव्हेंबर ला गृह मंत्रालय च्या सचिव यांच्यासोबत सीआईएसएफ डीजी यांची बैठक पार पडली. १८ नोव्हेंबर ला वीडियो कॉन्फ्रेंसिंगद्वारे सीआईएसएफ च्या डीजीकडून आपल्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, २२ नोव्हेंबर पर्यंत आपला रिपोर्ट सादर करावा.

Visit : Policenama.com