‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याच्या गृहमंत्रालयाचा महत्त्वपूर्ण ‘निर्णय’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पोलीस दलातील कर्मचाऱी आणि अधिकाराऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविभाग रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. त्यात गृहमंत्रालयानेही आपल्या पातळीवर तयारी केली आहे. कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. यात आता आठ नव्या नागपूर मध्यवर्ती या कारागृहाची भर पडली आहे. हे कारागृह तातडीने लॉकडाऊन करण्यात येत असल्याची माहित गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यापूर्वीच्या निर्णयानुसार राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद व नाशिक ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. यामध्ये आता नागपूर मध्यवर्ती कारागृहाची भर पडली आहे.

यापूर्वी लॉकडाऊन झालेल्या कारागृहातील कार्यपद्धतीनुसार नागपूर कारागृह अधीक्षकांनी कारागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक दोन शिफ्टमध्ये करावी. जे अधिकारी कर्मचारी कारागृहात काम करतील त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था आतच करण्यात यावी. मेन गेट लॉकडाऊन काळात पूर्णत: बंद राहील याची दक्षता घ्यावी. कारागृहात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. जेणेकरून त्यांच्या अडचणींचे निराकरण करता येईल.