‘बिग बॉस देख रहे हैं, ! गृह मंत्रालयाच्या तिसर्‍या डोळ्याचा ‘टप्या-टप्या’वर ‘वॉच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हापासून अमित शहांनी गृहमंत्रालयाचा कार्यभार सांभाळला तेव्हापासून गृहमंत्रालय बरेच चर्चेत आले आहे. गृहमंत्रालय कोणते निर्णय घेते यावर कायमच सर्वांची नजर असते. परंतू आता राष्ट्रपती भवनच्या जवळ असलेल्या नॉर्थ ब्लॉकमधील गृह मंत्रालयाच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

मंत्रालयानुसार, मागील आठवड्यापासून सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत मंत्रालयातील महत्वाच्या लोकेशनवर कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कार्यालयातील सुरक्षा अत्यंत कडक आहे. यावर आधिक काम केले जात आहे.

गृहमंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा CISF कडे सोपावण्यात आली आहे. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने सर्वांवर नजर ठेवण्यात येईल. याशिवाय बॉडी कॅमेरा, एक्स रे मशिन आणि मेटल डोर डिटेक्टर देखील सुरक्षेसाठी ठेवण्यात आले आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे पहिल्या मजल्यावर लावण्यात येतील जेथे गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, गृह सचिव, सीबीआय डायरेक्टर, आयबी चीफ, जाॅइंट सेक्रेटरी असतात. गृह मंत्रालयानुसार याला A रूटीन अपग्रेडशन म्हटले जाते, फक्त गृह मंत्रालयातच नाही तर आता वित्त मंत्रालयात देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील.

सीसीटीव्हीने काय होईल
आता स्पष्ट झाले की कॅमेरे लावण्यात आल्यानंतर गृह मंत्रालयाच्या प्रत्येक कोपऱ्यात नजर ठेवण्यात येईल. मंत्रालयाच्या मिडिया रुममध्ये देखील कॅमेरे लावण्यात येतील. आता कोण कोणाला भेटते यावर नजर ठेवण्यात येईल.

मंत्रालयात सीसीटीव्ही लावण्यात आल्याने मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि सांगितले की आता कोण कधी येतो यावर कठोर नजर ठेवण्यात येईल.

visit : policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like