मंदिर, रेस्टॉरंटसाठी केंद्र सरकारच्या ‘या’ आहेत नव्या गाईडलाईन्स ! सामुहिक प्रार्थना, प्रसाद, तीर्थ वाटपास पूर्णपणे बंदी

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने मंदिर आणि रेस्टॉरंट यांना ८ जूनपासून उघडण्यास परवानगी दिली असून त्यासाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धार्मिक स्थळांबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. तोंडावर मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळणे हे नियम सक्तीचे करण्यात आले आहेत.

नव्या नियमांनुसार आता मंदिरात प्रसाद वाटप करण्यास बंदी आहे. त्याचबरोबर तीर्थ देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मंदिरात भजन, किर्तन करता येणार नाही. त्याचबरोबर सामुहिक प्रार्थना करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.हॉटेलमध्ये आता ५० टक्के ग्राहक एकावेळी बसवता येणार आहेत. हॉटेलमध्ये येणार्‍या व्यक्तीचे सामान निजंर्तुक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कंटेनमेंट झोनमधील सर्व मॉल्स, रेस्टॉरंटस, धार्मिक स्थळे, हॉटेल आणि कार्यालये बंदच राहतील.