खुशखबर ! पॅरा मिलिटरी सर्व्हिस पॅकेज, ‘डेबिट’ कार्डवर जवान – अधिकाऱ्यांना एक कोटी रुपयांचा ‘विमा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृह मंत्रालयाने पॅरा मिलिटरी सर्व्हिस पॅकेज डेबिट कार्डला अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. दहा लाखाहून अधिक जवानांना आणि अधिकाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. एकाच कार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा यावेळी दिल्या जाणार आहेत. अनेक प्रकारच्या कर्जाणंव्यतिरिक्त सीएपीएफ कर्मचाऱ्यांचा विमा कवर देखील वाढवण्यात आला आहे. सुभेदार मेजर यांना 75 हजार रुपये, सहाय्यक कमांडंट ते डेप्युटी कमांडंटला दीड लाख रुपये आणि त्यावरील सर्व पदांवर दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येणार आहे. एअर अ‍ॅक्सिडेंटल डेथ कव्हर 1 कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. या सर्व सुविधा गृह मंत्रालयाच्या कराराअंतर्गत एसबीआय कडून देण्यात येणार आहेत. योजनेचा कालावधी 4 जानेवारी 2020 ते 3 जानेवारी 2021 पर्यंत असेल. यानंतर या योजनेचे नूतनीकरण झाल्यानंतरच वरील सुविधा सुरू राहू शकतात.

डेबिट कार्ड केले सुरु
सीआरपीएफ, बीएसएफ, सीआईएसएफ, एनएसजी, एसएसबी, आईटीबीपी आणि आरपीएसएफच्या जवानांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या पदानुसार वेगवेगळे डेबिट कार्ड सुरु करण्यात आलेले आहेत. सुभेदार आणि मेजर पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांना गोल्ड कार्ड मिळेल तर डेप्युटी कमांडंट किंवा सहायक कमांडंटला डायमंड कार्ड आणि टूआईसी ते डीजी पर्यंत अधिकाऱ्यांना प्लॅटिनम कार्ड दिले जाईल. या कार्डचे सर्व फायदे निवृत्ती वेतनधारकांनाही उपलब्ध असतील. परंतु, निवृत्तीवेतनधारकांना वैयक्तिक अपघात कव्हर विम्याची सुविधा देण्यात आलेली नाही.

ही आहे डेबिट कार्डची वैशिष्टये 
एका महिन्यात कोणतीही निश्चित रक्कम ठेवण्याची गरज नाही.
लाइफ टाइम यूनिक अकाउंट नंबरला सुविधा दिली जाईल.
पर्सनल एक्सीडेंट इंश्योरेंस डेथ कवर 30 लाख रुपये इतका असेल.
एयर एक्सीडेंट इंश्योरेंस डेथ कवर एक कोटी रुपये देण्यात आला आहे.
कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 30 लाख रुपयांची मिळेल मदत.
आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख दिले जातील.
हे अ‍ॅडॉन कव्हरमध्ये (अपघाती मृत्यूच्या बाबतीत) देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे
जळालेल्या परिस्थितीत असेल तर प्लास्टिक सर्जरीसाठी दोन लाख रूपये दिले जातील.
आयात केलेली औषधे आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च एक लाख रुपयांपर्यंत दिला जाईल.
अपघातानंतर कोमा किंवा मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये.
मुलांच्या महाविद्यालयीन पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी चार लाख रुपये दिले जातील.
मुलीच्या लग्नासाठी दोन लाख रुपये.
अपघाताच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कुटुंबातील दोन सदस्यांना 20 हजारांपर्यंत प्रवासासाठी खर्च.
रुग्णवाहिकेचा खर्च 1,500 रुपये

आंतरराष्ट्रीय गोल्ड डेबिट कार्ड आणि प्लॅटिनम डेबिट कार्डवरील वैयक्तिक अपघात विमा मृत्यू कव्हर व्यतिरिक्त, दोन लाख आणि पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध असेल. तसेच, चार लाख आणि दहा लाख रुपयांचे हवाई अपघात कव्हरही वेगळ्या पद्धतीने दिले जाणार आहे.सामानाच्या नुकसानाची तपासणी करण्यासाठी विमा संरक्षण 25 हजार आणि 80 हजार रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे. कार्ड हरवल्यास 80 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा कवर देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय गोल्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून एका वेळेस 50 हजार रुपये काढता येऊ शकतात. तर प्लॅटिनम कार्ड धारकांसाठी ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like