लक्षणं नसलेले ‘कोरोना’ रुग्ण घरीच घेऊ शकतात उपचार ? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची लक्षणं ही साथीच्या आजारासारखी आहेत. ताप सर्दी खोकला अशी लक्षणं असलेल्या लोकांनाही कोरोना झाल्याची शक्यता असते. हेच कारण आहे की, कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कारण त्यांचे हे आजार बरे झाले नाही तर नंतर लक्षात येत की, त्यांना कोरोना झाला आहे. दुसरीकडे असेही काही लोक आहेत आहेत ज्यांना कोरोना झालेला असतो परंतु त्यांच्यात लक्षणं दिसत नाहीत. अशा रुग्णांपासूनही इतरांना संक्रमणाचा धोका असतो.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनीही नुकतंच असं सांगितलं आहे की, लक्षणं नसलेल्या रुग्णांनी घरीच उपचार घेणं फायदेशीर ठरेल. यामुळं आरोग्य व्यवस्था आणि रुग्णालयांवर येणारा ताण कमी होईल. तज्ज्ञांनी दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कोरोनाची लक्षणं नसलेले रुग्ण घरीच उपचार घेऊ शकतात. यामुळं संक्रमणापासून दूर राहता येतं.

येडियुरप्पा यांनी राज्यातील कोरोना उपचार व व्यस्थापनासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांसोबत चर्चा केल्यानंतर सांगितलं की, “अनेक तज्ज्ञांची मते आहेत की, कोरोनाची लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांवर घरी उपचार करणं योग्य ठरेल. परिणामी हॉस्पिटलवरील भार कमी होईल.”

या बैठकीला स्पार्स हॉस्पिटलचे डॉ. शरण पाटील, मनिपाल हॉस्पिटलचे डॉ. सुदर्शन बल्लाळ, फोर्टीस हॉस्पिटलचे डॉ. जावळी आणि पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे डॉ. गिरधर बाबू यांच्यासह इतर मंडळी उपस्थित होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like