जाणून घ्या : त्वचेवर आणि डोक्यावर होणारं फंगल इन्फेक्शन दूर करण्याचे अगदी सोपे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळा आणि हिवाळ्यात त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्यात फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. फंगल इन्फेक्शन वेगवगेळ्या प्रकारचे असू शकतात. डोक्याला, त्वचेला कुठेही फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. काही लोकांची त्वचा फारच संवेदनशील असते, म्हणून त्यांच्या त्वचेवर लाल चट्टे, पुरळ, खाज या समस्या होतात. तसेच फंगल इन्फेक्शन डोक्याबाबत असो व त्वचेबाबत असो, त्यावर वेळेवर उपाय करणं गरजेचं असते. त्वचेसंबंधी बॅक्टेरियल आणि फंगल संक्रमण फार त्रासदायक ठरु शकत. याकडे वेळीच लक्ष नाही दिलं तर ही समस्या अधिक वाढते.

डोक्याला होणारं फंगल इन्फेक्शन
डोक्याच्या त्वचेत अनेक इन्फेक्शन होतं. त्याची लक्षणे नॉर्मल स्किन इन्फेक्शनपेक्षा फार वेगळी असतात. डोक्याच्या त्वचेत फंगल इन्फेक्शन झालं तर त्वचेवर छोटे फोड येतात. जाड, लाल आणि चिकट थर तयार होतो. ही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर वेळीच उपाय केला गेला नाही तर तुम्हाला केसगळतीची समस्या होऊ शकते.

त्वचेवरचं फंगल इन्फेक्शन
त्वचेवरील फंगल इन्फेक्शन देखील फार त्रासदायक असते. त्यात त्वचेवर पुरळ येणे, लाल चट्टे, लाल पुरळ, पिंपल्स येतात. काही लोकांच्या हातच्या त्वचेवर एक थर तयार होतो.

उपाय
फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी स्वतःला कोरड ठेवा. अँटी-बॅक्टेरियल साबणाचा वापर. स्वच्छ कपड्यांचा वापर करा. शरीर स्वच्छ ठेवा. भिजलेले कपडे वापरु नका. त्याने फंगल इन्फेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होईल.

अ‍ॅलोव्हेरा जेल
त्वचेबद्दल असणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅलोव्हेरा जेल मदत करते. फंगल इन्फेक्शन मध्ये अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर केल्यास इन्फेक्शन कमी होत. त्याने रॅशेस, खाज आणि जळजळ दूर होते. त्यासाठी अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचेवर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने त्वचा धुवा.

कडुलिंबाची पाने
कडुलिंबाची झाडे सगळीकडे असतात. या झाडाच्या पानाची पेस्ट, काढा अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते. कडुलिंबातील तत्व, जे एकप्रकारे अँटी- फंगल गुणाने भरपूर असतात. यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करुन पेस्ट तयार करा. यात एक चमचा लिंबाचा रस आणि हळद टाका. फंगल इन्फेक्शन झालेल्या भागात ही पेस्ट लावा. ३० मिनिटं ही पेस्ट लावून ठेवा. नंतर पाण्याने धुवा. त्याने त्वचा आणि डोक्याचे त्वचेच्या वेगवगेळ्या समस्या दूर होतात.