घरात किंवा बाहेर अचानक BP Low झाल्यास, त्वरित ‘या’ पदार्थांचे सेवन करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रोजचं जीवन जगत असताना वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारींचा सामना सगळ्यांनाच करावा लागतो. आजकाल लठ्ठपणा आणि रक्तदाबासंबंधी समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना उद्भवणाचा धोका असतो. उच्च रक्तदाब हे आरोग्यासाठी घातक ठरतं त्याचप्रमाणे अचानक रक्तदाब कमी झाल्यानेही शरीराला नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. अनेकवेळा प्रवासादरम्यान, ऑफिसमध्ये कामाचा ताण असल्यास किंवा घरी एकटं असताना बीपी लो होण्याची समस्या होते. अशावेळी कोणते पदार्थांचे सेवन करायचे हे जाणून घेऊयात.

साखर आणि मिठाचे पाणी

दिवसभरातील शारीरिक हालचाल, औषध खाण्यापिण्याच्या सवयी यासारख्या काही गोष्टीवर आपला रक्तदाब अवलंबून असतो. अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर इलेक्ट्रॉड पावडर किंवा मीठाचं पाणी पिणं आवश्यक आहे. रक्तदाब कमी झाल्यानंतर त्वरित साखर आणि मिठाचं पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय तुम्ही लिंबू पाण्याचंही सेवन करु शकता. तुम्ही कामासाठी बाहेर पडत असाल तर नेहमी पाणी आणि साखर सोबत ठेवा.

कॉफी

रक्तदाब कमी झाल्यास कॉफीचं सेवनही शरीरास फायदेशीर ठरतं. कॉफीचं सेवन केल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो. अनेकांची सकाळ ही कॉफी प्याल्यानंतरच सुरु होते. जर चहा किंवा कॉफी घेतला नाही तर अनेकांना डोकं जड झाल्यासारखं वाटतं. पण कॅफिनचं सर्वाधिक सेवन केल्याने आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. तसंच कॉफी योग्यवेळी घेतली नाही तर शरीरासाठी नुकसानकारक ठरु शकतं. उपाशीपोटी कॉफी पिल्यास आरोग्यास नुकसानकारक ठरु शकतं.

गोड पदार्थ

अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर गोड पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी केळी, पपई, मुळा या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. बाहेर जाताना सोबत एखादं चॉकलेट किंवा साखर ठेवल्यास असा अचानक त्रास झाल्यास उपयोगी ठरु शकतं.

रोज व्यायाम करणं

व्यायाम किंवा योगा रोज केल्यानं रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. उद्भवल्यास कमी तीव्रतेने उद्भवते. यासाठी 20 ते 30 मिनिटे वेळ काढून रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. याशिवाय रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने ब्लड फ्लो आणि सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत होते. तसेच हे रक्तदाब नॉर्मल ठेवण्यासाठीही मदत करते.

ज्येष्ठमध

कमी रक्तदाबावर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे रक्तवाहिन्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तुळस

तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. कमी रक्तदाबावर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची 10-15 पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

खास टिप – ही सर्व माहिती आम्ही केवळ माहितीसाठी म्हणून वाचकांसाठी देत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरतं.