आम्ल पित्ताच्या त्रासावर करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – अनेकजण आम्ल पित्ताच्या त्रासाने हैराण झालेले असतात. अनेकांना तीनही ऋतूत पित्ताचा त्रास असतो. अशा वेळी यावर नेमका काय उपाय करावा हेच त्यांना समजत नाही. पण आपण जर काही घरगुती उपाय केले तर आपली हि समस्या लवकर आटोक्यात येण्यास मदत होईल. पाहुयात असे कोणते घरगुती उपाय आहेत की, ज्यांनी आपली पित्ताची समस्या नियंत्रणात येते.

१) तुमच्या आहारातील थंड दुधाच्या समावेशाने, पोटातील अतिरिक्त आम्लं शोषलं जातं. थंड दुधात एक चमचा सब्जा पित्तासाठी अतिशय उपायकारक ठरतं. त्यामुळे आहारात दुधाचा समावेश अवश्य करा.

२) आपल्या शरीरातील पाणी आणि पीएच पातळी सुयोग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, थंड दूध, ताक आदी द्रवपदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करणं महत्त्वाचं आहे. शहाळ्यामुळे नैसर्गिक पद्धतीनं मूत्रविसर्जनाचं प्रमाण वाढतं. तसंच यात पोटॅशियम आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

३) आवळा, पेरु, संत्र आणि लिंबू यासारखी फळं ‘क’ जीवनसत्त्वयुक्त आहेत. थोडीशी आंबट असल्याकारणानं अनेकांना या फळांमुळे पित्त वाढेल अशी भीती वाटते, परंतु ‘क’ जीवनसत्त्वयुक्त असलेली ही फळं पित्तासाठी परिणामकारक ठरतात.

४) केळं हे फळ पित्तावर औषध म्हणून सर्वसाधारणपणे घरगुती उपायांमध्ये वापरलं जातं, उत्तम फायबरच्या समावेशामुळे केळं हे पित्तमारक ठरतं. मोसमी फळं तसंच विविध रंगांची फळं खावीत. यामुळे नैसर्गिक स्तरावर अँटीऑक्सिडंटचे फायदे मिळतात आणि शरीराची ऊर्जा क्षमताही वाढीस लागते.