नाभी इन्फेक्शन दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नाभीचा संसर्ग टाळण्यासाठी घरगुती उपाय करता येऊ शकतात. संसर्गामुळे नाभीमध्ये सूज, लालसरपणा, वेदना, हिरव्या किंवा राखाडी प्रदररासारखी समस्या होते. बॅक्टेरिया अथवा यीस्टमुळे नाभीमध्ये संसर्ग होतो. कोणत्याही वयात हा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग टाळण्यासाठी काही घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा केल्यास नाभीचा संसर्ग दूर होतो.

पहिला उपाय
एलोवेरा जेलचा. एलोवेरा जेल आठवड्यातून २-३ वेळा नाभीवर लावल्यास ऐलोवेरामधील अँटी बॅक्टेरियल तत्त्व संसर्गापासून बचाव करतात.

दुसरा उपाय
म्हणजे अर्धा-अर्धा चमचा हळद आणि पाणी एकत्र करुन पेस्ट बनवा. हे नाभीवर १५ मिनिटे लावून ठेवावी.

तिसरा उपाय
करण्यासाठी एक वाटी कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळून कापसाच्या मदतीने नाभी स्वच्छ करावी.

चौथा उपाय
हा लिंब आणि हळदीचा आहे. यासाठी लिंबाच्या ५-८ पानांची पेस्ट बनवा. यामध्ये चिमूटभर हळद मिसळून नाभीवर लावा. १५ मिनिटांनंतर धुवून घ्यावे. आणखी एक उपाय म्हणजे एक-एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि खोबरेल तेल मिसळा. यामध्ये टी टी ऑइलचे ३-४ थेंब मिसळून कापसाने नाभीवर लावा.

अर्धा चमचा लसणाचे तेल कापसाच्या मदतीने नाभीवर लावा. १५ मिनिटांनंतर स्वच्छ करा. तसेच एक-एक चमचा व्हिनेगर आणि कोमट पाणी मिसळा. हे कापसाच्या मदतीने नाभीवर लावा. २० मिनिटांनंतर स्वच्छ करावी. तसेच अर्धा चमचा लवंगाचे तेल कापसाच्या मदतीने नाभीवर लावा. १५ मिनिटानंतर स्वच्छ करुन घ्यावी.