‘या’ घरगुती उपायांनी होईल मुलांची त्वचा तजेलदार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपला चेहरा सुंदर दिसावा असे मुलांनीही वाटते. मुलांना आपला चेहरा सुंदर करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. या उपायांची माहिती आपण घेणार आहोत. या उपायासाठी बदाम, मध, अंडी आणि पेट्रोलियम जेली यांची गरज असते. हा पॅक आठवड्यातून दोन वेळा लावल्याने रंग उजळतो. पॅक चेहऱ्यावर लावण्यास सुरूवात केल्यानंतर १५ दिवसांत प्रभाव दिसू लागतो.
हा पॅक बनविण्याची कृती आता पाहुयात.

पॅक बनविण्यासाठी पाण्यात भिजवलेले बदाम घेऊन बारीक करावेत. यामध्ये अंड्याचा पिवळा भाग मिक्स करा. आता पेट्रोलियम जेलीमध्ये बदामाची पेस्ट आणि अंडे मिक्स करा. यामध्ये मध टाकून हे पुन्हा चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता पॅक तयार झाला आहे.

हा पॅक लावण्यासाठी सर्वात अगोदर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. नंतर चेहऱ्यावर पॅक लावावा. पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावर पाणी लावून दोन मिनिटे हलकी मालिश करा. चेहरा पाण्याने धुऊन घ्यावा. यामुळे स्किन पोर्स ओपन होतील. आता कॉटनच्या मदतीने चेहरा आणि मानेवर गुलाबजल लावावे. अशाप्रकारे हा पॅक वापरण्यास सुरूवात केल्यानंतर पंधरा दिवसात चांगले परिणाम दिसून येतील. मात्र, हा उपाय करण्यापूर्वी सौंदर्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्या, नंतरच उपाय करा.