किडनी निरोगी ठेवण्यासाठी सकाळी करा ‘हा’ सोपा उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायले तर पोट कमी होते. तसेच आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. त्यामुळे पोट कमी होते. कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे सर्दी-पडशाची समस्याही दूर होते.

नियमित कोमट पाणी प्यायल्याने घशातील कफ निघतो. यामुळे दम्याची समस्या नियंत्रित होते. शिवाय, कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू मोकळे होऊन वेदना कमी होतात. रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते. अशा वेळी किडनी खराब होण्याचा धोका टळतो. गरम पाण्यात लिंबूरस टाकून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमीन सी मिळते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरामधील अ‍ॅसिडचे प्रमाण नियंत्रित होऊन अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. जेवणाचे योग्य प्रकारे पचन होते. यामुळे भूक वाढण्यात मदत मिळते.