‘हे’ आहेत कॅलरी बर्न करण्याचे सोपे घरगुती उपाय 

पोलीसनामा ऑनलाईन टीम – संशोधनांनुसार हे सिद्ध झाले आहे की, घरातील काही कामे दररोज दोन तास केली तरी मोठ्याप्रमाणात कॅलरी सहज बर्न होतात. केर काढणे, फरशी पुसल्यामुळे ३०० ते ३५० कॅलरी बर्न होतात. यामुळे हात सुडौल होतात आणि शरीराच्या वरच्या भागाचे स्नायू बळकट होतात. फरशी पुसण्यासाठी वारंवार वाकावे लागते. यामुळे पोटावर आणि मांड्यावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होते.

आपल्या घरातच काही कामे केल्यास कॅलरी आपोआपच बर्न होतात. घरात कोणते काम केल्यावर किती कॅलरी बर्न होतात ते आपण पाहूया. गादी टाकणे – २० कॅलरी, दरवाजे स्वच्छ करणे – ७० कॅलरी, भांडी घासणे धुतल्यास -१ तासात १२५ कॅलरी, स्वयंपाक करणे १ तासात – १५० कॅलरी, प्रेस करणे – १ तासात १२८ कॅलरी बर्न होतात. अशाच प्रकारे अन्या कामे केल्यानंतरही मोठ्याप्रमाणात कॅलरीज बर्न करता येताता. ही कामे कोणकोणती आहेत ती आपण पाहूयात. बागकाम केल्यामुळे मांसपेशींची कार्यक्षमता वाढते. यामुळे सांध्यांमध्ये लवचिकता येते. जर तुम्ही अर्धा तास गार्डनमध्ये पाणी देणे, खुरपणे, रोप लावण्यासारखी कामे केली तर पोट, हात आणि नितंबावर दबाव पडतो. यामुळे जवळपास ४०० कॅलरी जळतात.

बाथरूमची स्वच्छता करताना सर्वांत जास्त पाय, पोट आणि नितंबाच्या आजूबाजूचे स्नायू काम करतात. यामुळे हाताला आणि खांद्याला बळकटी मिळते. बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करणे हा पोट आणि नितंबावरील चरबी कमी करण्याचा सोपा उपाय आहे. वॉशिंग मशीनऐवजी हातांनी कपडे धुण्याची प्रक्रिया तुम्हाला फिट ठेवण्यास मदत करते. कपडे धुताना तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. एक तास कपडे धुणे आणि वाळवणे यादरम्यान १३० ते १५० कॅलरी जळतात.