मणक्यातील वेदना हे असू शकते पॅरालिसिसचेही लक्षण

पोलिसनामा ऑनलाइन टीम – मणक्यातील वेदना अनेकदा मानेपासून सुरू होऊन शरीराच्या इतर भागातही होतात. या दुखण्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. अन्यथा पॅरालिसिससारखा गंभीर आजार होण्याचा धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी काही उपाय आहेत. हे उपाय कोणते ते पाहुयात.

सव्र्हायकलमध्ये नसांवर दबाव पडल्यामुळे दुखणे मानेपासून पायांच्या अंंगठ्यापर्यंत जाणवते. यापासून बचावासाठी डोके हळूहळू क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज फिरवावे. डोक्याला वर-खाली आणि उजव्या-डाव्या बाजूने फिरवल्यास फायदा होतो. सव्र्हायकल झाल्यावर मेंदूला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी मध्येच काही वेळासाठी बंद होऊ शकते.

मानेत दुखत असेल तर कोणत्याही तेलाने हलक्या हाताने मालिश कराचे. मालिश नेहमी मानेकडून खांद्याकडे करावी. सव्र्हायकलमध्ये अचानक हात खूप दुखू लागतो. निष्काळजीपणा केल्यास पॅरालिसिस होण्याचा धोका वाढतो. यासाठी मालिशनंतर गरम पाण्याने शेकावे. शेकल्यानंतर लगेच मोकळ्या हवेत जाऊ नये. तसेच थंड पदार्थ खाऊ नयेत. उंच उशी घेणारांना सव्र्हायकल पेन सारखा त्रास होतो. यासाठी अतिशस कमी जाडीची मऊ उशी घ्यावी. चांगली गादीही वापरल्याने दुखणे कमी होते.कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीयुक्त पौष्टिक आहार घेतल्याने हाडांना मजबुती मिळते.